Wednesday, February 11, 2026

प्रा.डॉ. विजय कदम राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील मन्वंतर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ​प्रा.डॉ.विजय कदम यांना ‘मेस्टा’चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) संघटनेचे आकरावृ राज्य राज्यस्तरीय अधिवेशनात आत्म मलिक ध्यानपीठ कोकणठाण येथे पार पडले. यावेळी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता मिष्टा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर संजयराव तायडे पाटील यांच्या हस्ते अहमदनगर महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख तथा तक्षशिला इंग्लिश मीडियम व ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक प्रा. डॉ. विजय कदम यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. कोकमठाण येथील आत्ममलिक ध्यानपीठ येथे हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
​राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार किशोर दराडे, शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी आणि मेस्टा संघटनेचे संजयराव तायडे पाटील यांसह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

​डॉ. विजय कदम यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य आणि तक्षशिला ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून दिलेले योगदान विचारात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या शैक्षणिक निष्ठेचा गौरव असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. डॉ. कदम यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!