Friday, April 17, 2026

देवगड शिवारात फुले रेवती वाणाचे ज्वारी पिक जोमात

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील देवगड व बकुपिंपळगाव शिवाराच्या मध्ये पोपटराव मोरे या अल्पभूधारक शेतकऱ्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून रब्बी हंगामासाठी फुले रेवती वाणाचे बी उपलब्ध केले. या रेवती जातीला पेरणी अगोदर एक पाणी व तदनंतर एक महिन्याने दुसरे पाणी दिले. विशेष म्हणजे सुरुवातीला फक्त सेंद्रिय खत शेणखत वापरले आहे कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत वापरले नाही मोरे यांना सेंद्रिय ज्वारीचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट होते. या ज्वारीच्या शेतावर कुठेही कीड अथवा रोग आढळून आला नाही अजून एक पाणी म्हणजे एकंदरीत तीन पाणी देऊन उत्पादन चांगली येईल असे त्यांनी सांगितले.
त्यांना एका एकरातून दहा ते बारा क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे.एक क्विंटल ज्वारीला ५ हजार रुपये भाव मिळाला तर दोन पैसे मिळतील असा त्यांनी अंदाज व्यक्त केला.

कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे व महाराष्ट्र शासनाचे कृषी खात्यामधील कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके यांनी त्यांच्या प्रक्षेत्राची पाहणी केली. डॉक्टर ढगे यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन कौतुक केले व इतर शेतकऱ्यांनी प्रक्षेत्राला भेट द्यावी असे आवाहन केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!