Wednesday, April 22, 2026

नेवासा पोलिसांची कामगिरी;महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबडणाऱ्या चोरट्याला २४ तासात अटक

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील सुकली येथे शेळ्या चारत असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबडणाऱ्या चोरट्याला पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या पथकाने २४ तासात
केली आहे.

याबाबद अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील सुकळी फिर्यादी बबनबाई बनकर या सुकळी गावच्या शिवारात चारोटी पाटावर शेळ्या चारत असताना दोन अनोळखी इसम मोटार सायकलवरून आले व रस्ता कुठे जात आहे ? याबाबत या महिलेला विचारण्याचा बहाणा करून तीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने घेऊन गेले याबाबत या महिलेने नेवासा पोलीस ठाण्यात फिर्यात दाखल केलेली होती. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू,नेवासे पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे,विकास पाटील यांनी सदर गुन्ह्यात तांत्रीक तपास तसेच सी.सी.टी.व्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढली असता सदरचा गुन्हा हा आरोपी सुदाम विक्रम जाधव याने त्याचे साथीदारा सोबत केला आहे अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर
पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे,विकास पाटील,पोलीस कॉस्टेबल अतुल शेळके,पोलिस शिपाई गणेश जाधव, वाल्मीक वाघ, यांनी
सदर आरोपीस २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात यश मिळविल्यामुळे पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाणतेतून कौतुक केले जात आहे.

*महेश पाटील,पोलीस निरीक्षक

शेळ्या चारणाऱ्या माहिलेला हा रस्ता कुठे जातो? असे विचारण्याचा बहाणा करून आरोपीने या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडण्याचा गुन्हा केल्याची कबुली आरोपीना पोलिसांनी खाक्या दाखवताच या गुन्ह्यांची कबुली दिली असून पुढील कायदेशीर तपास चालू आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!