Friday, February 27, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी;दरोडा व जबरी चोरी करणारे ०२ आरोपी जेरबंद

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे शाखेने दरोडा व जबरी चोरी करणारे ०२ आरोपी जेरबंद केले असून आरोपींकडुन दरोडा व जबरी चोरीचे ०३ गुन्हे उघड केले आहेत.

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी प्रतिभा पंढरीनाथ साठे रा. नारायणडोह, ता. जि. अहिल्यानगर यांचे पती घरासमोर झोपलेले असतांना दि. २२/०२/२०२६ रोजी रात्री ०२.०० वा. चे सुमारास अनोळखी ५ आरोपींनी फिर्यादीचे पती यांच्यावर चाकूने वार करुन तसेच घराचा दरवाजा कटावणीचे सहाय्याने उचकटुन घरातील लोकांना काठीने मारहाण केली व घरातील २,१७,५००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दरोडा टाकुन चोरुन नेले आहेत. सदर घटनेबाबत नगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ११२/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१० (२), ३९१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

वरीलप्रमाणे गुन्हा घडल्यानंतर गुन्हा ठिकाणी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलुबर्मे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा किरणकुमार कबाडी, यांनी गुन्हा ठिकाणी भेट देवून गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना दिलेल्या आहेत. सदर सुचनांनुसार पोनि किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हरिष भोये, पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, फुरकान शेख, दिपक घाटकर, अतुल लोटके, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार ज्योती शिंदे, भगवान धुळे यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले.

वर नमुद पथकाने यापूर्वी दरोड्याचे गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आरोपींची माहिती संकलित करुन व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढत असतांना पथकास दि. २५/०२/२०२६ रोजी गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा सोमीनाथ काळे रा. कॉंडगांव, ता. पैठण याने व त्याचे इतर साथीदारांनी केला असल्याची व ते पांढरे रंगाचे कारमधुन चांदबिबी महाल येथुन वाळुंज कडे जाणारे असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ चांदबिबी महाल परिसरामध्ये सापळा रचुन फोर्ड फिस्टा कार क्रमांक एम. एच. ०३ बी. एच. ९००२ ही व त्यामधील दोन इसम ताब्यात घेतले, ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे १) सोमीनाथ उर्फ पिप्या मिनाजी काळे वय ३० वर्षे, २) चिंग्या उर्फ सौरभसचिन काळे वय २१ वर्षे, दोन्ही रा. कौंडगांव तांडा, कौडगांव, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांकडे व्यवसायीक कौशल्याचे आधारे सखोल तपास करता त्यांनी वरील प्रमाणे गुन्हा हा त्यांचे साथीदार ३) चिक्या गोप्या चव्हाण रा. कौंडगांव तांडा, कौडगांव, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर (फरार), ४) तुषार नंदु भोसले रा. सदर, ५) आसिफ निमाजी काळे रा. सदर (फरार), ६) भगवान इंपीरियल चव्हाण रा. वाळुंज, ता. जि. अहिल्यानगर (फरार) अशांनी केला असल्याची कबुली दिली.

*आरोपींवर खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत….

नगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं.
११२/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१० (२), ३११,
नगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं.
११३/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१० (२), ३११,
भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गु.र.नं.
६६/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (६)

आरोपीचे कब्जातुन गुन्ह्याचे वेळी वापरलेली ३,००,०००/- रुपये किमतीची कार, १२,०००/- रुपये किमतीचे ०२ मोबाईल असा एकुण ३,१२,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी नगर तालुका पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास नगर तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!