Thursday, February 26, 2026

वडाळा बहीरोबा येथे गावठी कट्टयासह एकास अटक

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील वडाळा बहीरोबा येथे स्थानिक गुन्हे शाखेने गावठी कट्टा (अग्निशस्त्र) बाळगणा-या आरोपीकडून एक गावठी कट्टा हस्तगत करून एकास अटक केली आहे.

याबाबद अधिक माहिती अशी की,पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काडुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार श्री. किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे राहुल द्वारके, दिपक घाटकर, लक्ष्मण खोकले, हृदय घोडके, सोमनाथ झांबरे, राहुल डोके, किशोर शिरसाठ, यांचे पथक तयार करुन सदर पथकास नेवासा तालुक्यामध्ये अवैध शस्त्रे वाळगणारे इसमांची माहिती काढून कारवाई करणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.
दि. २५/०२/२०२६ रोजी नमुद पथक हे सोनई पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे प्रदिप जगधने रा. वडाळा वहीरोबा ता. नेवासा हा वडाळा बहीरोबा गावात त्याचे कमरेला गावठी कट्टा लावुन फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी हॉटेल संदिपचे पाठीमागे सापळा लावला असता एक इसम संशयीतरित्या फिरतांना दिसुन आला. सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव प्रदिप मोहन जगधने (वय २१ वर्षे) रा. वडाळा बहिरोबा ता. नेवासा जि. अहिल्यानगर असे असल्याचे कळविले. ताब्यातील इसमाची झडती घेतली असता त्याचे कब्जातुन ३० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र), असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताब्यातील इसमाविरुध्द पोकॉ किशोर आबासाहेब शिरसाठ नेम स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. ७२/२०२६ आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!