नेवासा/प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे धारदार शस्त्र कब्जात बाळगुन लोकांमध्ये दहशत निर्माण करण्या-या आरोपीकडुन दोन तलवारी व एक चाकु हस्तगत केला आहे.
याबाबदत अधिक माहिती अशी की,।पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार श्री. कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, गणेश धोत्रे, विष्णु भागवत, अमोल आजबे, चालक महादेव भांड यांचे पथक तयार करुन सदर पथकास नेवासा तालुक्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.
दि. २४ रोजी नमुद पथक हे नेवासा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत कुकाणा तरवडी गावात इसम नामे सौरभ राजेंद्र वडगे हा त्याचेकडे काही धारदार शस्त्र विनापरवाना कब्जात बाळगुन लोकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी जावुन इसम नामे सौरभ राजेंद्र वडगे (वय २३ वर्षे) रा. तरवडी, कुकाणा ता.नेवासा जि. अहिल्यानगर यास ताब्यात घेवुन ताब्यातील इसमाची व परिसराची झडती घेतली असता, त्याचे कब्जातुन ६००० रुपये किमतीचे दोन तलवार,५०० रुपये किमतीचा एक चाकु असा एकुण ६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील इसमाविरुध्द पोकॉ अमोल श्रीरंग आजबे निमणुक स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाणे गु.र.नं. 151/2026 आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


