Thursday, June 25, 2026

देडगाव जवळ मुळा उजवा कालवा फोडला;कालव्याचे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

मुळा उजवा कालवा फोडून कालव्याचे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध मुळा पाटबंधारे विभागाने अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील देडगाव गावाजवळ कालव्याचे अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून नुकसान केल्याची घटना काल दि.24/02/2026 रोजी रात्री घडली.सदर प्रकारामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले असून शेतीसाठी होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या प्रकरणी संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्ध कायदेशीर तरतुदीनुसार नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे.

कालवे व संबंधित जलसंपदा संरचना या सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असून त्यांचे नुकसान करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. भविष्यात अशा प्रकारचे प्रकार टाळण्यासाठी मुळा पाटबंधारे विभाग सर्व नागरिकांना आवाहन करीत आहे की, कालवा, बंधारा किंवा इतर जलसंपदा संरचनेबाबत कोणतीही संशयास्पद हालचाल, नुकसान किंवा छेडछाड आढळल्यास त्वरित संबंधित विभागाला कळवावे.

सार्वजनिक जलसंपत्तीचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. आशा इशरा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!