नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावातील विविध प्रश्नासाठी ग्रामस्थांनी सूरु केलेले उपोषण तहसीलदारांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
सौंदाळा येथील २२० केव्ही सबटेशन येथे आउट सोर्सिंगमध्ये जागा देतांना ग्रामसभा ठरावमध्ये नमूद केल्याप्रमाणे गावातीलच सुशिक्षित बेरोजगार तरुण तातडीने घेतले पाहिजे, सौंदाळा गावातील सर्व शिव रस्ते मोजणी करून खुले व अतिक्रमण मुक्त करावेत, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करून गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, महावितरण ३३ केव्ही च्या सबटेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व फिडरवर शेतीच्या ट्रान्सफार्मर वर वाड्या वस्ती साठी दिली जाणारी सिंगल फेज पूर्ण दाबाने द्यावी,सौंदाळा ग्रामपंचायतीने आकारलेल्या ३३ केव्ही च्या पोल डीपी कर वसुलीच्या कारवाईचा तहसीलदार यांनी आपलेकडे प्रस्थाव पाठवावा, रांजणगाव येथील गौण खनिज वाहतुकीमुळे सौंदाळा गावातील रस्ते खराब झाले आहेत त्यामुळे त्यांनी शासनाकडे भरलेल्या करातून सौंदाळा गावातील रस्ते करण्यासाठी निधी मिळावा,सौंदाळा गावात नवीन रेशनकार्ड ऑनलाइन करणे व त्यांना धान्य पुरवठा करण्यासाठी तातडीने कॅम्प आयोजित करावा,पानंद रस्ता योजनेअंतर्गत सौंदाळा येथील पानंद रस्ता करण्यासाठी तातडीने १० लाख रु निधी मिळावा या मागण्यासाठी
सरपंच शरद आरगडे यांच्या नेतृत्वाखाली सौंदाळा ग्रामस्थांनी दि. २३ फेब्रूवारी रोजी सकाळी ११ वाजता महादेव मंदिर देवस्थान सभामंडपात बेमुदत आमरण उपोषण सूरु केले होते.
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी दि.२५ रोजी सांयकाळी तहसीलदार संजय बिरादार यांनी उपोषणस्थळी येवून उपोषण करताना मागण्याबाबद लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी भिवसेन गरड,गणेश आरगडे सचिन आरगडे,बाळासाहेब आरगडे,भाऊसाहेब आरगडे,मधुकर आरगडे बाबासाहेब बोधक संजय गोरे,मच्छिंद्र आरगडे,लक्ष्मण आरगडे,बाळासाहेब बोधक,प्रदीप आरगडे,अमोल आरगडे,प्रियंका आरगडे,श्रद्धा आरगडे,मंगल बोधक, ज्योती बोधक,रुकसाना सय्यद, मयुरी आरगडे आदी उपस्थितीत होते.
या निर्णयामुळे सौंदाळा ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून प्रशासनाचे सहकार्य लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.


