Thursday, June 25, 2026

उद्योजिका सुवर्णा साबळे शिवदुर्गा पुरस्काराने सन्मानित

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील उद्योजिका सौ.सुवर्णा रवींद्र साबळे यांना जागतिक महिला दिनानिमित्त यशस्वी उद्योजका म्हणून उद्योगमंत्री मा.डॉ.उदय सामंत हस्ते शिवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुंबईत येथे ‘शिवसेना महिला सेनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दि.८ मार्च रोजी आयोजित ‘शिवदुर्गा सन्मान सोहळ्या’ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव व उत्कृष्ट उद्योजकांना त्यांच्या कार्यासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सौ.सुवर्णा साबळे या मुळच्या नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त डेप्युटी चिफकेमिस्ट बद्रीनाथ साबळे यांच्या सुनबाई असून सध्या त्या गंगापूर तालुक्यातील गळनिंब या गावी गारमेंट्स निर्मिती व विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिला व पुरुषांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांच्या कामाची दखल घेवून शिवसेना महिला सेनेच्या वतीने उद्योगमंत्री मा.डॉ.उदय सामंत यांचे हस्ते त्यांना शिवदुर्गा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, माजी खासदार गजानन कीर्तिकर,
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार ज्योतीताई वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!