Thursday, April 30, 2026

आर्ले पाटील अर्बन यांच्या वतीने कर्तबगार अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविकांना पुरस्कार प्रदान

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील आर्ले पाटील अर्बन यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षी दिला जाणारा कर्तबगार अंगणवाडी सेविका पुरस्कार वर्षा नानासाहेब चिंधे यांना तर कर्तबगार आशा स्वयंसेविका पुरस्कार नूतन राम मुळे यांना देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

नेवासा येथे झालेल्या महिला सक्षमीकरण मेळाव्यात सदरचे पुरस्कार हे रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.धनश्रीताई सुजय विखे पाटील यांच्या हस्ते व आमदार सौभाग्यवती सौ. रत्नमालाताई लंघे पाटील, सौ.घुले, भाजप महिला आघाडीच्या भारती बेद्रे,आर्ले पाटील अर्बनच्या चेअरमन सौ.मीना गणेश आर्ले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व रुपये रोख ५ हजार रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
 यावेळी बोलताना आर्ले पाटील अर्बनच्या चेअरमन सौ.मीनाताई आर्ले म्हणाल्या की, आमच्या पतसंस्थेने जवळपास शंभरच्या पुढे अंगणवाडी सेविका यांना विनातारण कर्जाचे वाटप केले आहे त्यामुळे त्यांची उत्कर्षाकडे वाटचाल सुरू झाली आहे.
    
कर्ज घेतलेल्या महिलांनी वेळच्यावेळी हप्ते भरून आमच्या योजनेला सफल करून दाखवण्यात आम्हाला मोठे सहकार्य केले आहे तसेच यापुढेही ज्या आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांना कर्जाची आवश्यकता असेल अशा सर्व आशा सेविकांनी मुख्य कार्यालय कुकाणा येथे येऊन संस्थेशी प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन चेअरमन सौ.मीना गणेश आर्ले यांनी यावेळी बोलताना केले

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!