Wednesday, June 24, 2026

सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी यांचा नेवासा तालुका दौरा 

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा:शनिवार 2 मे रोजी सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी यांनी नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे शनी भगवंताचे दर्शन घेतले. त्यानंतर कुकाना येथील सावता परिषदेचे सचिव राहुल जावळे यांच्या हॉटेल यशराज या ठिकाणी सदिच्छा भेट दिली .सावता परिषदचा नगर जिल्ह्यातील व नेवासा तालुक्यातील आढावा घेतला व संवाद साधला.

यावेळी सावता परिषदेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल फुलसौंदर, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय उर्फ नंदू चौधरी, सावता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाऊ दरवडे, सावता परिषदेचे नेवासा तालुकाध्यक्ष शरद भाऊ तांबे, युवका आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल भाऊ गारुडे, सावता परिषदेचे नेवासा शहराध्यक्ष ऍड अर्थेश राऊत, संतोष गारुडे, अरुण फुल सौंदर, नवनाथ गवळी,, तसेच सावता परिषदेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!