Sunday, June 7, 2026

पसायदान आनंदवन सेवाभावी संस्थेचे’पुरस्कार जाहीर

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील सोनई येथील पसायदान आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त देण्यात येणारे ‘पसायदान’ पुरस्कार पंढरीनाथ महाराज वारकरी संस्थेचे पंढरीनाथ महाराज तांदळे, आरोग्य विषयी जागतिक स्तरावर कार्य असलेले डाॅ. संजय सोनवणे, साई आदर्श संस्थेचे संस्थापक शिवाजीराव कपाळे यांना जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष स्व. सोपानराव दरंदले यांची स्मृती जागृत रहावी म्हणून सुरु करण्यात आलेला दुसरा ‘पत्रकार रत्न पुरस्कार’ दैनिक अ‍ॅग्रोवनचे जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत नेटके यांना देण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे सचिव संजय गर्जे व गोविंद महाराज निमसे यांनी दिली.

संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवार १२ मे २०२६ रोजी ध्यानमंदीर प्रांगणात सायंकाळी ६ वाजता नेवासा येथील सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उध्दव महाराज मंडलिक व शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!