Sunday, June 7, 2026

गोंडेगावच्या हनुमान विद्यालयाचा ८३.८७ टक्के निकाल

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथील  कृष्णाई शिक्षण संस्थेच्या हनुमान माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेचा  निकाल ८३.८७ टक्के लागला आहे. विद्यालयाच्या निकालात पहिल्या तीन क्रमांकात मुलींनीच बाजी मारली आहे.

हनुमान माध्यमिक विद्यालयाचे एकूण ३१ विद्यार्थी  इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेस बसले होते,त्यापैकी २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयातील पहिले तीन गुणवंत विद्यार्थी असे…

प्रथम क्रमांक- साक्षी रामदास आढागळे(७८.२० टक्के), द्वितीय क्रमांक- श्रेया सुरेश वाघुले (७६.६० टक्के), तृतीय क्रमांक- दिपाली सुनील शिनगारे (७५.८० टक्के).

कृष्णाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  कडूभाऊ काळे,शाळेचे मुख्याध्यापक संदीप फुलारी, सर्व शिक्षक व पालकांनी  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!