Sunday, August 9, 2026

संपत्ती फार झाली आता चांगल्या संस्कारांची गरज-स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा(नेवासा)

विवाह सोहळ्यातील डीजेचा दणदणाट आणि रस्त्यावर पडलेले सत्कारांचे फेटे पाहिले की खूप वाइट वाटते. समाजाला त्रासदायक खर्च करण्यापेक्षा जिथे गरज आहे तिथे दान केले की खरे पुण्य मिळते. आज पैशाची कमी नाही. संपत्ती खूप झालेली आहे, मात्र आज संपत्तीची नाही तर चांगल्या संस्कारांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन
श्रीक्षेत्र देवगडचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील उद्योजक बापूसाहेब नजन यांनी त्यांच्या कन्याचे विवाह प्रसंगी सत्कार समारंभाला फाटा देवून त्या खर्चात
१११ वृक्षांची लागवड करणे,मानस कन्या अभियाना अंतर्गत ५ मुलींच्या शैक्षणिक पालकत्व घेणे,नागेबाबा गोशाळे करिता चारा वाटप,नागेबाबा मंदिर,दक्षिण मुखी हनुमान मंदिरासाठी आर्थिक देणगी देणे, रुग्णासाठी सूरु असलेल्या नागेबाबा परिवराच्या अन्नपूर्णा योजनेस आर्थिक मदत करणे व फर्नीचर मॉल मधील कर्मचाऱ्याचा प्रत्येकी१० लाख रूपयांचा अपघाती विमा पॉलिशी घेण्याचा संकल्प केला होता. शनिवार दि.८ ऑगस्ट रोजी
नजन परिवाराकडून स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे हस्ते
या संकल्पची पूर्ती करण्यात आली,त्यावेळी स्वामी बोलत होते.
नेवासा येथील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, नागेबाबा संस्थांनचे अंकुश महाराज कादे, ज्येष्ठ नेते काशिनाथ नवले पाटील, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक अशोकराव मिसाळ, दत्तात्रय काळे, तुकाराम मिसाळ, जलमित्र सुखदेव फुलारी, मारुतराव नजन,मुख्याध्यापक कैलास धानापुणे, बाबासाहेब नजन, शिवाजीराव तागड,देवीदास गव्हाणे,आबासाहेब काळे,रामकृष्ण
नवले, दादासाहेब गजरे, हरिभाऊ नवले,देवेंद्र काळे, संभाजी माळवदे, संजय राऊत, अजीत रसाळ,सुभाष चौधरी,हरिभाऊ नवले, कृष्णा गव्हाणे,रामराव आढाव,नवनाथ नवले,किशोर मिसाळ, संदीप मिसाळ, शिवाजी तागड, कारभारी मिसाळ,अंबादास गोंडे, दादा गजरे, संतोष औताडे,मंगेश निकम, राजेंद्र तागड, राजेंद्र चिंधे,बबन मिसाळ, शिवाजी फुलारी, सुनील गव्हाणे, बाळासाहेब वाघडकर, वाल्मीक लिंगायत, विश्वास कोकणे
आदी यावेळी उपस्थित होते.

स्वामी प्रकाशानंदगिरी पुढे म्हणाले की,
नजन बापूंना भास्करगिरीजी महाराज व घुले पाटलांचा आशीर्वाद मिळाल्याने त्यांच्या जीवनाचे सोने झाले. मानवी जीवन हे परोपकार करण्यासाठी आहे,समाजासाठी काम केले तर आपले जीवन आदर्शवत होते. नजन कुटुंबिय ही सामाजिक,आध्यात्मिक कार्यात नेहमीच पुढे असते.
डिजे बंदी करणे काळाची गरज असल्याचे सांगून सर्वानी एकत्र येवून डिजेबंदीसाठी प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन स्वामीनी केले.

माजी आ.पांडुरंग अभंग म्हणाले की, भेंडा ही ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि नागेबाबा या सत्पुरुष यांच्या पदस्पर्शने पावन झालेली भूमि आहे.
समाजाशी नाळ जोडलेले हे नजन कुटुंब आहे.समाजाला दूषण लागणाऱ्या गोष्टी बंद करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे,समाजाला दिशादर्शक काम आहे.
व्यसन स्वत:बरोबरच कुटुंबाची ही बर्बादी करते,त्यामुळे व्यसनमुक्ति करण्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा, आनंदी कुटुंब हिच खरी संपत्ती असे ही श्री.अभंग म्हणाले.

काशीनाथ नवले म्हणाले, नजन कुटुंबिय उद्योगक्षेत्रा बरोबरच सामाजिक, आध्यत्मिक कार्यात ही अग्रेसर असून ते आध्यात्मिक विचराचे पाइक आहेत.

उद्योजक बापूसाहेब नजन यांनी प्रास्ताविक भाषणात मानस कन्या अभियाना अंतर्गत ५ मुलींच्या शैक्षणिक पालकत्व आम्ही स्विकारले आहे. वाटप केलेल्या १११ वृक्षांची जोपसना करणाऱ्या व्यक्तींचा गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते सन्मान करणार असल्याचे सांगितले.गणेश महाराज चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. बाबासाहेब नजन यांनी आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!