नेवासा/सुखदेव फुलारी
महाराष्ट्र राज्यात ऊस गाळप हंगामाने जोर पकडला असून साखर आयुक्तालया तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार,राज्यातील ६० सहकारी व ६३ खाजगी अशा एकूण १३ साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात १ नोव्हेंबर २०२६ अखेर एकूण ९६ लाख ३२ हजार ६५९ टन उसाचे गाळप केले असून ७५ लाख ९ हजार ३९१ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा एकूण सरासरी साखर उतारा ७.८९ टक्के इतका आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी दि.१ नोव्हेंबर १५ लाख ८५ हजार ५३२ मेट्रिक टन ऊसाचे गाळप होऊन १२ लाख २३ हजार ७४० साखर पोती उत्पादित केली.जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ७.१३ टक्के आहे.
*कोल्हापूर विभाग:– ९,६९,८४२ टन उसाचे गाळप करून कोल्हापूर विभागाने ८७६४५६ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कोल्हापूर विभागाचा उतारा ९.०४ टक्के इतका आहे. विभागात १० सहकारी आणि ४ खासगी असे १४ कारखाने सुरु आहेत.
*पुणे विभाग:–पुणे विभागात १६ सहकारी आणि ७ खाजगी असे एकूण २३ कारखाने सुरु आहेत. त्यांनी आतापर्यंत २७,३९,७९६ टन उसाचे गाळप करून २३,८५,५०५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. पुणे विभागाचा उतारा ८.७१ टक्के आहे.
*सोलापूर विभाग:– ऊस गाळपात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात ९ सहकारी आणि १७ खाजगी असे एकूण २६ कारखाने सुरु आहेत. आतापर्यंत विभागात १६,६६,३३६
टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून १२,२४,५१५ क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. विभागाचा उतारा ७.३५ टक्के इतका आहे.
*अहिल्यानगर विभाग:– अहिल्यानगर विभागातील १० सहकारी आणि ९ खाजगी असे एकूण १९ कारखाने सुरु झाले आहेत. या विभागातील नगर-नाशिक जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी १६,५४,०६० टन उसाचे गाळप करून १२,६७,३८० क्विंटल साखर उत्पादित केली असून सरासरी साखर उतारा ७.६६ टक्के आहे.
*छत्रपती संभाजीनगर:– छत्रपती संभाजीनगर विभागात ७ सहकारी व ६ खाजगी अशा १३ कारखान्यांनी ११,६६,१२० टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून ८,३५,४८० क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. विभागाचा उतारा ७.१६ टक्के इतका आहे.
*नांदेड विभाग:-– नांदेड विभागात ९ सहकारी व १७ खाजगी अशा २६ कारखान्यांनी १३,०५,५०० टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून ९,११,६९५ क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. विभागाचा उतारा ६.९८ टक्के इतका आहे.
*अमरावती विभाग:— अमरावती विभागातील २ खाजगी कारखाने सुरु असून १,३१,००५ टन उसाचे गाळप करून ९५,३८० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा ७.२८ टक्के आहे.
*नागपूर विभाग:— नागपूर विभागात अद्याप एक ही कारखाना सुरू नाही.
*अहिल्यानगर जिल्हा*
अहिल्यानगर जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी दि.१ नोव्हेंबर १५ लाख ८५ हजार ५३२ मेट्रिक टन ऊसाचे गाळप होऊन १२ लाख २३ हजार ७४० साखर पोती उत्पादित केली.जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ७.१३ टक्के आहे.
जिल्हयातील इतर कारखान्यांचे ऊस गाळप मेट्रिक टन, उत्पादित साखर पोती व कंसात साखर उतारा टक्के असे…
१) अंबालिका- २०८४८५ मे. टन,१६३४०० पोती (७.८४)
२) प्रवरा- १८५७०० मे. टन ,१४०६०० पोती (७.५७),
३) ज्ञानेश्वर–१६६४७० मे. टन, १२८५५० पोती (७.७२),
४) मुळा- १५८४५० मे. टन , १२०४५० पोती (७.६०),
५) गंगामाई–१४५६६० मे. टन, १०७६०० पोती (७.३९)
६) श्रीगोंदा- १३१५०० मे.टन, १११४५० पोती (८.४८),
७) संगमनेर- १००२५० मे. टन, ८०९२० पोती (८.०७)
८) कोळपेवाडी- ८९४९० मे. टन, ७३९२५ पोती (८.२६),
९) बारामती ऍग्रो- ५७८०८ मे. टन, ५१६५० पोती (८.९३),
१०) संजीवनी-४५१५७ मे. टन, २७६२५ पोती (६.१२),
११) प्रसाद शुगर- ९१९०० मे. टन , ७१६७० पोती (७.८०)
१२) गणेश- २६४०० मे.टन, २००७५ पोती (७.६०),
१३) वृद्घेश्वर- ४९६४० मे. टन, ३४४७५ पोती(६.९५)
१४) अगस्ती- २५१०६ मे. टन,१५९१० पोती (६.३४)
१५) क्रांतिशुगर- ५२०५० मे. टन, ४११०० पोती (७.९०)
१६) स्वामी समर्थ- ५१४६५ मे. टन,३४३६० पोती (६.६८)


