नेवासा/प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यातील रस्ते विकास व पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून नेवासा तालुक्यातील ५९.४० कोटींच्या चार महत्त्वपूर्ण विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
*मंजूर विकासकामे असे…
१) रामा -६६ ते शनी शिंगणापूर ते कांगोणी रस्ता सुधारणा – ७.८४ कोटी रुपये.
२) सोनई-घोडेगाव-कुकाणा रस्ता (राम-६६) सुधारणा व लहान पुलाचे बांधकाम – १३.१६ कोटी रुपये.
३) सोनई-कांगोणी ते अहिल्यानगर-संभाजीनगर रस्ता (प्र.जि.मा. १८९) मजबुतीकरण – २१.९७ कोटी रुपये.
४) कांगोणी-खरवंडी आणि खरवंडी-वडाळा बहिरोबा रस्ता सुधारणा – १५.६३ कोटी रुपये.
या विकासकामांमुळे नेवासा तालुक्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार असून नागरिकांच्या प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे. आ.लंघे यांच्या प्रयत्नामुळे कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्याच्या विकास कामांना चालना मिळत आहे.


