नेवासा/प्रतिनिधी
गोदावरी परिक्रमेला गेलेल्या अहिल्यानगर जिल्हा व नेवासा तालुक्यातील संत-महंत,साधक महाराज मंडळींनी श्रीक्षेत्र पिठापूर (आंध्रप्रदेश) या ठिकाणी दि.३० ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे निर्माते-जीर्णोद्धारक वै.गुरुवर्य बन्सी महाराज तांबे यांची ३२ वी पुण्यतिथी साजरी केली.
शनिवार दि.२४ ऑक्टोबर पासून गोदावरी परिक्रमेला गेलेल्या श्रीक्षेत्र नेवासा परिसरातील सर्व संत महंत महाराज साधक मंडळी वै.बन्सी महाराज तांबे यांच्या ३२ व्या पुण्यतिथीच्या दिवशीं दि.३० रोजी श्रीक्षेत्र पिठापूर (आंध्रप्रदेश) येथे वास्तव्यास असतांना त्यांनी तिथे वै.बन्सी महाराज तांबे यांची प्रतिमा पूजन,काकडा भजन,गीता पारायण,भजन करून हरिपाठ केला.
यानिमिताने सकाळी ब्रह्मानंद स्वामीजी यांचे तर सायंकाळी श्रीराम महाराज झिंजुर्के यांचे प्रवचन झाले.आरती व पसायदानाने समारोप झाला.
स्वामी अवधूत पुरीजी महाराज व ह भ प सेवानाथ महाराज यांच्या वतीने पंगत देण्यात आली.
यावेळी गोदावरी परिक्रमेतील सहभागी असलेले सर्व संत महंत, कीर्तनकार महाराज,साधक मंडळी उपस्थित होते.