नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील डॉ.सृष्टी कल्याण नेहूल हिने महाराष्ट्र आयुर्वेदिक विज्ञान युनिव्हर्सिटी नाशिक मार्फत घेण्यात आलेल्या बीएएमएस अंतिम वर्ष परीक्षेमध्ये विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला.
डॉ.सृष्टी हिने अहिल्यानगर येथील गंगाधर शास्त्री गुणे आयुर्विदेक महाविद्यालयामधून बीएएमएस पूर्ण केले आहे. तिने ऑगस्ट २०२६ मध्ये बीएएमएस अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती. तिला २५५० गुणापैकी एकूण १९९७ गुण प्राप्त झाले . आजपर्यंत मेहनत ,जिद्द व आत्मविश्वासाने ती सातत्याने सर्व परीक्षा उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होत गेली आहे .
डॉ.सृष्टी हिला महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉ.दत्तात्रय लोडे व सहकारी प्राध्यापक वर्ग
व तिची आई विमल नेहुल, वडील कल्याण नेहुल यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले.
तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचिन जगताप, नेवासा तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनी,भेंडा बुद्रुक व जवखेडे दुमाला ग्रामस्थांनी अभिनंदन केले .


