नेवासा/प्रतिनिधी
भेंडा पंचायत समिती गणाचे माजी सदस्य अजित मुकुटे व सौंदाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ. संजीवनी मुरकुटे यांची कन्या कु.राधा मुरकुटे हिची १४ वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
कु.राधा मुरकुटे ही नेवासा फाटा येथील सेंट मेरी स्कूलची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी असून नेवासा तालुका व अहिल्यानगर जिल्हा पातळीवर हॉलीबॉल स्पर्धेतून तीची पुणे विभागीय संघासाठी निवड झाली होती. शनिवार दि.३१ ऑक्टोबर रोजी चिपळूण येथे झालेल्या विभागीय हॉलीबॉल स्पर्धेमधून तिची १४ वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेकरिता राष्ट्रीय निवड चाचणीतून महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
सेंट मेरी स्कूलचे प्राचार्य सिस्टर ज्योतिष, प्रशिक्षक विष्णू खांदोडे व पापा शेख यांचे तिला मार्गदर्शन लाभले.


