नेवासा
नेवासा तालुका भारतीय जनता पार्टी व जय हरी महिला प्रतिष्ठाण यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रांगोळी, व नुत्य स्पर्धा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीकृष्ण लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. रत्नमालाताई लंघे होत्या. जय हरी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माजी जिल्हा परीषद सदस्या सौ.आशाताई मुरकुटे,भाजपा तालुकाध्यक्षा सौ.भारतीताई बेंद्रे, शिवसेना तालुका प्रमुख सौ.मिराताई गुजांळ, सौ.ज्योतीताई जाधव,सौ.मनिषाताई फुलारी, सौ.मंगलताई काळे, सौ.सोनालीताई क्षीरसागर व्यासपीठावर उपस्थित होत्या .
यावेळी डॉ.रजनीकांत पुंड,डॉ.सुभाष भागवत यांचे आरोग्य विषयक व्याख्याने झाले.
सौ आशाताई मुरकुटे…
जय हरी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जयहरी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ आशाताई मुरकुटे यांनी केले.
यावेळी घेण्यात आलेल्याब रांगोळी स्पर्धेतील विजेते असे….
प्रथम क्रमांक- अंताक्षरी सातपुते,द्वितीय क्रमांक- भारती पुंड व समृद्धी मिसाळ,तृतीय क्रमांक- श्रुतिका काळे व
स्वाती गोधंने/फुलारी,उत्तेजनार्थ- स्नेहल खाटीक
नृत्य स्पर्धा विजेते असे…
प्रथम क्रमांक-शितल पाचरे,द्वितीय क्रमांक- उर्मिला शिंदे,तृतीय क्रमांक-अदिती इथापे,उत्तेजनार्थ – कांचन पवार.
रांगोली परीक्षक म्हणून भाऊसाहेब काळे , गोंडेगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप फुलारी , आशाताई नवथर , आशाताई डौले व नृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रख्यात गायिका ममता खेडेकर,प्रिया मुनोत, डॉ.रजनीकांत पुंड यांनी निवड करून विजेते स्पर्धकांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय हरी महिला प्रतिष्ठानच्या सर्व महिलाव भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी,ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब क्षिरसागर,शरद जाधव,देवेंद्र काळे,आण्णासाहेब गव्हाणे, भागवत दाभाडे,माऊली सोनवणे,संभाजी गडाख,संभाजी सोनवणे अजित पवार,कमलेश काळे,वसंत काळे यांनी परिश्रम घेतले.
जय हरी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.आशाताई मुरकुटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.