नेवासा
नेवासा तालुक्यातील कांगोणी गावचे सुपुत्र प्रा. वसंत लक्ष्मण पुंड हे डिसेंबर २०२३ मध्ये दिलेल्या एनटीए-युजीसी नेट (NET) परीक्षा मराठी विषयातून उत्तीर्ण झाले आहेत.
प्रा.पुंड या अगोदर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेली सेट (SET) परीक्षा शिक्षणशास्त्र व मराठी या दोन विषयात ते अगोदरच उत्तीर्ण झालेले आहेत. मराठी, इतिहास व शिक्षणशास्त्र या तीन विषयात स्नातकोत्तर पदवी संपादन केलेली आहे तसेच शिक्षणशास्त्रातील एम . फील . पदवी संपादन केली आहे. त्यांचे ज्ञान संपादनाचे व ज्ञानदानाचे कार्य अविरत चालू आहे.
त्यांच्या यशाबद्दल प्रा. पुंड यांचे ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख, आमदार शंकरराव गडाख, पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिता गडाख, उपाध्यक्ष उदयन गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, प्राचार्य डॉ.भानुदास चोपडे आदींनी अभिनंदन केले.