Tuesday, March 17, 2026

सोमनाथ कुलकर्णी गुरुजी यांच्या संकल्पनेतून गुढीपाडव्यापासून सामुहिक श्रीविष्णुसहस्रनाम अनुष्ठान सुरूवात  अधिक महिन्यानिमित्त भव्य धार्मिक अनुष्ठानाचे निशुल्क आयोजन  संपर्क साधण्याचे कुलकर्णी गुरुजी यांचे आवाहन

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

गुहा वार्ताहर :सोमनाथ कुलकर्णी गुरुजी यांच्या संकल्पनेतून सामुहिक श्रीविष्णुसहस्रनाम अनुष्ठान, अकरा कुंडी श्री महाविष्णू याग, तीर्थयात्रा व गाव धोंड्याचे आयोजन – यावर्षी ज्येष्ठ महिन्यामध्ये 17 मे 2026 पासून पुरुषोत्तम मास (मल मास) म्हणजेच अधिक महिना येत आहे.अधिकस्य अधिक फलम म्हणजेच अधिक महिन्यात केलेली उपासना,व्रते, विविध प्रकारची दाने अधिक पुण्यप्राप्ती करून देतात. अध्यात्मिक व आत्मिक उन्नतीसाठी फलदायी ठरतात. हा पुरुषोत्तम मास आहे म्हणजेच यामध्ये भगवान पुरुषोत्तम महाविष्णूंची पूजा, उपासना, व्रत, नियम,जप, तप नामस्मरण अत्यंत महत्त्वाचे सांगितलेले आहे. यामध्ये श्री विष्णुसहस्रनाम व तुलसी अर्चन याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवीन वर्षातील चैत्र शुद्ध प्रतिपदा या हिंदू नववर्षारंभी श्री सोमनाथ कुलकर्णी गुरुजी गुहा तालुका राहुरी यांच्या संकल्पनेतून विविध धार्मिक कार्यक्रमाचे निशुल्क धार्मिक सेवार्थ सामूहिक आयोजन करण्यात आलेले आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा पुढील प्रमाणे आहे. श्री विष्णुसहस्रनाम पाठ व तुलसी अर्चन- गुढीपाडव्यापासून प्रत्येकाने आपल्या घरी बाळकृष्ण शाळीग्राम अथवा श्री भगवान विष्णूंना दररोज आपल्या वेळेप्रमाणे सवडीनुसार शुचिर्भूत होऊन श्री विष्णुसहस्रनामाचा पाठ श्रवण करून, बरोबर म्हणून शक्य तेवढे तुलसी पत्र अर्पण करावयाचे आहे. आपण केलेल्या पाठाची नोंद ठेवायची आहे. अकरा कुंडी श्री महाविष्णू याग – गुहा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे दिनांक 18 /19/ 20 मे 2026 रोजी अकरा कुंडी श्री विष्णू यागाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये होम हवन व एक लक्ष तुलसी अर्चना रोज होणार आहे.यामध्ये ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांना होम हवनास बसता येईल. आपल्या सोयीनुसार वेळेनुसार एक तास ते तीन दिवस भाग घेता येईल. मुक्कामी थांबणाऱ्या भक्तांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. वीस तारखेला पूर्णाहूती होणार आहे. सर्व सेवा नि:शुल्क आहे. तीर्थयात्रा – 21मे 2026 रोजी गुरुपुष्यामृत योगा निमित्ताने विविध तीर्थयात्रा व देवदर्शनास ज्यांना येणे शक्य आहे त्यांची लक्झरी बस द्वारे व्यवस्था केलेली आहे.

ज्यांना या उपक्रमात भाग घ्यायचा असेल ते सर्व नि:शुल्क धर्मार्थ सेवार्थ यामध्ये भाग घेऊ शकतात. प्रवासाचा मार्ग पुढील प्रमाणे राहील – पैस खांबदर्शन, श्रीक्षेत्र देवगड दर्शन, गणेशाच्या 21 पिठांपैकी पौराणिक अशा श्री लक्ष विनायकाचे दर्शन, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक श्री घृष्णेश्वराचे दर्शन वेरूळ, शुलीभंजन, श्री भद्रा मारुती दर्शन, महेश माळ वरील गिरीजा मंदिर दर्शन( श्री शिवलीलामृतातील घडलेली कथा ), महेश माळ येथील श्री बालाजी मंदिर दर्शन, श्री गणेशाच्या साडे तीन पिठा पैकी राजुर श्री महागणपती दर्शन,देऊळगाव राजा येथील श्री बालाजी दर्शन, शेगाव. शेगाव परिसर दर्शन, मेहकरच्या अतिशय पुरातन अशा श्री शारंगधर बालाजी चे दर्शन, श्री नृसिंहाच्या पौराणिक पिठांपैकी भगवान नृसिहाचे दर्शन , लोणार सरोवर दर्शन,धारतीर्थ, मधुसूदन मंदिर दर्शन, चुंबकीय मारुती दर्शन, श्री दत्त आश्रम जालना आदी ठिकाणी भेटी व दर्शनाचे नियोजन आहे. प्रवास कालावधी हा दोन ते तीन दिवसाचा राहील. राहण्याची उत्तम व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे. भोजन व प्रसादाची ही व्यवस्था राहील.

 हे धार्मिक तीर्थाटन असल्याने धार्मिक भावनेनेच सामील होता येईल. प्रत्येक ठिकाणी संकल्प पूजा अर्चा यांची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. गावधोंडा व महाप्रसाद- दिनांक 25 मे 2026 रोजी गंगा दशहरा समाप्ती निमित्त अधिक महिन्याचे पर्व काला निमित्त गाव धोंडा व श्री महाविष्णू यागाचा महाप्रसादाचे गुहा येथे आयोजन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी विविध पूजा अर्चा, किर्तन सेवा, भजन, व महाप्रसाद होईल. दोन महिन्याच्या सार्वजनिक अनुष्ठानाची सांगता होईल. कार्यक्रमाचे आयोजन श्री सोमनाथ कुलकर्णी गुरुजी स्वखर्चातून निशुल्क करणार असून जास्तीत जास्त भाविकांनी या अनुष्ठानात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे. अशा प्रकारे कार्यक्रमाचे नि:शुल्क, धर्म सेवार्थ व जगात कल्याणासाठी संभाव्य नियोजन असून ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी _*श्री सोमनाथ कुलकर्णी गुरुजी गुहा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल क्रमांक 9823506235/ 9420312011,, चि. सोहम कुलकर्णी गुरुजी मो. 9420912066/9552079909_* या नंबर वर संपर्क साधावा.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!