Tuesday, October 15, 2024

जगद्‌गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्या निमित्त ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न

शेवगांव/प्रतिनिधी

शेवगांव येथे आयोजित केलेल्या नाणीजधाम येथील जगद्‌गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा कार्यक्रमाची सुरुवात धर्म ध्वजारोहणाने करण्यात आली.

शेवगांव येथील खंडोबा मैदानात दि. ५ फेब्रुवारी, २०२४ रोजी नाणीजधाम येथील जगद्‌गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा होत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात दि. २१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता धर्म ध्वजारोहणाने करण्यात आली.

यासाठी नाणीजधाम येथील पुरोहितांच्या विधीवत शास्त्रोक्त पुजाविधीने धर्म ध्वज व स्वामीजींच्या प्रतिमेचे श्री. विनोद ठाणगे व सौ.सुनंदा ठाणगे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.
शेवगांव जनसंघ मंचाचे अध्यक्ष अॅड. विद्याधर काकडे, कार्यक्रमाचे मुख्य प्रोटोकॉल अधिकारी भगवान भुंबर, श्री. बंडुशेठ रासने, डॉ. निरज लांडे, संप्रदाय अहमदनगर (दक्षिण) निरीक्षक सोमेश्वर घोगरे, जिल्हाध्यक्ष सागर तिखे यांचे हस्ते धर्म ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी शेवगांव शहरातील नगरसेवक महेश (रिंकु) फलके, जगदीशशेठ धुत, डॉ. देहाडराय या मान्यवरांसह जगद्‌गुरु नरेंद्र महाराज संप्रदायाचे उत्तर अहमदनगर निरीक्षक दत्तात्रय उन्हाळे, जिल्हाध्यक्ष सयाजी भडांगे, शेवगांव येथील तसेच अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी व भक्तगण उपस्थित होते.

:

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!