Wednesday, February 11, 2026

माका येथे मंकावती देवी यात्रोत्साहाचे आयोजन

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील माका येथील जागृत ग्रामदैवत मंकावती देवीचा यात्रा उत्सव आज गुरुवार दि.२५ जानेवारी पासून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

यात्रे निमित्त गुरूवारी सकाळी ९ वाजता प्रवरासंगम येथून आणलेल्या गंगा जलाची गावामधुन सवाद्य मिरवणूक काढून त्या गंगाजलाने देवीला अभिषेक होणार आहे. त्यानंतर प्रत्येक घराघरातून देवीला पुरणपोळी व साडीचोळीचा नैवद्य वाजत-गाजत अर्पण केला जाईल.
रात्री ८ वाजता देवीचा छबिना (पालखी) मिरवणूक काढण्यात येनार आहे .छबिण्या समोर फटाके व शोभेची दारूची आतषबाजी करण्यात येते. त्यावेळी परिसरातील नागरिक व महिलांची प्रचंड गर्दी होते. संध्याकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत सविता राणी पुणेकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होणार आहे.
दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि.२६ रोजी सकाळी गावातील हनुमान मंदिरासमोर सविता राणी पुणेकर व नामवंत कलाकारांचा हजेरीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दुपारी २ वाजता राज्यातील नामवंत पैलवानांचा जंगी हंगामा होणार आहे.
यात्रा उत्सवामुळे मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे .तरी परिसरातील नागरिकांनी या यात्रेचा आनंद घ्यावा अशी विनंती जगदंबा देवी ट्रस्ट व यात्रा समितीच्या वतीने कळविण्यात येत आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!