नेवासा
नगर येथे 3 फेब्रुवारी रोजी ओबीसीचे राष्ट्रीय नेते मंत्री छगन भुजबळ व इतर ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्याच्या तयारी करिता भेंडा येथे ओबीसी समाज कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात बुधवार दि.२४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हा परिषद सदस्य दत्तू भाऊ काळे यांचे अध्यक्षखाली व रासपचे नेते शशिकांत मतकर,समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे,अमोल अभंग,भाऊसाहेब जावळे,राहुल जावळे यांचे प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न झाली.या बैठकीत नगर येथे होणारा ओबीसी एल्गार मेळावा यशस्वी करण्यासाठी पूर्व तयारीचे नियोजन व शुक्रवार दि.२६ जानेवारी रोजी दुपारी २:३० वाजता कुकाणा येथे साईश्रद्धा मंलग कार्यालयात होणाऱ्या तालुकास्तरीय नियोजन बैठकीची माहिती देण्यात आली.
यावेळी अजित रसाळ, आबासाहेब काळे, सुखदेव फुलारी, संदीप फुलारी,सुरेश धनवडे,भाऊसाहेब फुलारी, भाऊसाहेब काळे, शिवाजी फुलारी, बापूसाहेब फुलारी, हनुमंत फुलारी, देवेंद्र काळे,सचिन पुंड, संतीष फुलारी, विष्णू फुलारी, गोकुळ काळे, तुळशीराम तुपे, डॉ. संतोष फुलारी, सचिन शिरोळे, पांडुरंग तुपे, नवनाथ फुलारी, विवेक नन्नवरे,संभाजी सोनवणे आदि यावेळी उपस्थित होते.