नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला भारतीय शुगर, कोल्हापुर या देश पातळीवर मान्यता असलेल्या संशोधन संस्थेचा “बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को-ऑपरेटिव्ह शुगर मिल अवॉर्ड” जाहिर झाला आहे.
भारतीय शुगर, कोल्हापुर ही मान्यता प्राप्त संशोधन संस्था असून १९७५ पासून सहकारी आणि खाजगी साखर क्षेत्रासाठी काम करते. या संस्थेतर्फे दरवर्षी साखर उद्योगात कार्यरत असणारे साखर कारखाने, अधिकारी व पदाधिकारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सर्वांगीण क्षेत्रात केलेले कार्य, साखर उद्द्योगातील अमूल्य योगदान आणि साखर उद्योगाला आघाडीवर आणण्याचा प्रयत्न याबद्दल हा “बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को-ऑपरेटिव्ह शुगर मिल अवॉर्ड” देण्यात येत आहे. दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजी कोल्हापुर येथे विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.