Monday, May 6, 2024

डॉ. विनायक शिंदे यांचा महाराष्टृ कृषी आयडॉल पुरस्काराने सन्मान

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शनिवार, दि. 20 जानेवारी 2024 रोजी कृषिसमर्पण फाऊंडेशनचे संस्थापक-संचालक असलेल्या डॉ. विनायक भाऊसाहेब शिंदे यांना शेतकरी उपयोगी संशोधन आणि अतुलनीय कृषी विस्तार कार्याकरिता तसेच कृषिशिक्षणामध्ये नवनविन प्रयोग करण्याकरिता स्पर्श सेवाभावी संस्था, अहमदनगरद्वारे राज्यस्तरीय ‘महाराष्टृ कृषी आयडॉल पुरस्कार-2024’ने सन्मानित करण्यात आले.

नगर तालुक्यातील स्पर्श सेवाभावी संस्था ही स्पंदन प्रकल्पाच्या माध्यमातून कचरा व भंगार गोळा करणाऱ्या महिलांच्या आरोग्यावर काम करत असून संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्यासह लायब्ररीसाठी लागणारे पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या संथेच्या वतीने दरवर्षी कृषी, कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक संस्था, उद्योग, ऐतिहासिक, समाजसेवक इत्यादी क्षेत्रामध्ये अतुलनीय कार्य करणारया व्यक्तींचा तसेच संस्थेंचा मानपत्र,

पदक व स्मृतिचिन्हाने सन्मानित करण्यात येत असते. गेल्या बारा वर्षांपासून कृषि विस्तार क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापक डॉ. विनायक शिंदे यांना या वर्षीच्या ‘महाराष्टृ कृषी आयडॉल पुरस्कार-2024’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. शिंदे हे पारगाव भातोडीचे भूमिपुत्र असून त्यांनी जवळपास सात वर्षांपुर्वी ‘कृषिसमर्पण फाऊंडेशन’ या नऊ लाखांपेक्षा अधिक फ़ॉलोवर्स

असलेल्या सामाजिक संस्थेची स्थापना केली व सोशल मीडियांचा प्रभावी वापर करत शेतकर्‍यांमध्ये कृषिसाक्षरता वाढविण्याकरिता प्रकाशने, कार्यशाळा इत्यादीद्वारे उल्लेखनीय कार्य केले आहे. कृषिसमर्पण फाऊंडेशनची स्वत:ची स्वतंत्र्य वेबसाईट, एंड्रोईड अ‍ॅप, ब्लॉग, फेसबूक ग्रुप, युट्युब चॅनल, इत्यादी सक्रिय आहेत. यासह शेतकरी फसवणूकी विरोधामध्ये ते नेहमी लढा देत असतात.

कृषी क्षेत्रातील शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याकरिता या अगोदर त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रिय, विभागीय तसेच प्रादेशिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमास समाजसेविका ममताताई सिंधुताई सपकाळ, महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या अध्यक्षा शुभांगी पाटील, डॉ. सारिका बांगर,

न्यास नोंदणी कार्यालयाच्या रुपाली गीते, पोस्टल संघटनेचे संतोष यादव, बूथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंभे, माहेर संस्थेच्या सुप्रिया मंडलिक, संजय पठाडे, मौलाना रियाज अहमद साहब, विनय सपकाळ, शरद झोडगे, मोहसीन पठाण, सुप्रिया मंडलिक, संस्थेच्या अध्यक्षा शितल साळवे, संस्थापक-सचिव प्रविण साळवे, खजिनदार अमोल आल्हाट, उपाध्यक्ष मीनाक्षी आल्हाट आदी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!