माय महाराष्ट्र न्यूज:— ओबीसी आरक्षण मिळविण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांना या अगोदर ही मोठा त्रास सोसावा लागला,आजही ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आणि आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी लढत आहेत. ओबीसींच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी सर्व ओबीसी समजाने मंत्री छगन भुजबळांच्या मागे ताकतीने उभे राहावे असे आवाहन समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग यांनी केले.
नगर येथे ३ फेब्रूवारी रोजी ना.छगन भुजबळ व इतर ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्याच्या आनुषंगाने कुकणा येथील साई श्रद्धा मंगल कार्यालयात आयोजित नेवासा तालुका नियोजन बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन
माजी आ.अभंग बोलत होते.समता परिषदेचे प्रवक्ते नागेश गवळी, जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, भिवाजी आघाव,सुधाकर आव्हाड, शशिकांत मतकर,कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बोरुडे, माजी जिल्हा परीषद सदस्य दत्तात्रय काळे, देवीदास साळुंके,अल्पसंख्यक सेलचे अब्दुल शेख,माजी उपसभापती अशोकराव मांडलिक, अशोकराव मिसाळ, बाळासाहेब पाटील आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार पांडुरंग अभंग पुढे म्हणाले की, ओबीसीचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ, प्रकाश बापू शेंडगे, आमदार गोपीचंद पडळकर,आमदार माधवराव जानकर व इतर ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत ३ फेब्रुवारी रोजी नगरमध्ये ओबीसी एल्गार मेळावा होत आहे.ओबीसी मध्ये
असलेल्या सर्व जाती धर्मांच्या व्यक्तींना, भटक्या विमुक्तांना मेळाव्यासाठी बरोबर घ्यावे.हा मेळाव्या करिता नेवासा तालुक्यातून जास्तीत जास्त ओबीसी समाजाने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावे.समता परिषदेचे प्रवक्ते नागेश गवळी म्हणाले, देशाच्या जडणघडणीत ओबीसीचे मोठे योगदान आहे.
ओबीसी समाज हा देशाचा निर्माण करता समाज आहे १६ व्या शतकाचा विचार केला तर ओबीसी समाज मावळा म्हणून लढले त्यावेळी त्यांच्या पाठीशी छत्रपती शिवाजी महाराज खंबीरपणे उभे होते १८ व्या शतकाचा मागावा घेतला तर हेच ओबीसी शुद्र,अस्पृश्य म्हणून हिणवले गेले,त्यावेळी महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव त्यांच्या पाठीशी उभे होते. आणि आज २१ व्या शतकाचा विचार केला तर ओबीसी समाज म्हणून आपण आपल्या हक्कासाठी लढा देत असताना छगन भुजबळ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.ओबीसीमध्ये समावेश असलेल्या सर्व जाती धर्मातील समाज बंधवांना बरोबर घेऊन आपल्या हक्काचा लढा यशस्वी करु.
रवींद्र लोखंडे, डॉ.संतोष फुलारी,सोमनाथ नाईक, बाबासाहेब घुले, राहुल जावळे, अब्दुल शेख, राजेंद्र बोरुडे, नागेश आघाव, शशिकांत मतकर, डॉ. रामनाथ बडे,भिवाजी आघाव, प्रशांत शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या नियोजन बैठकीकरिता मोहनराव गायकवाड,डॉ. रावसाहेब फुलारी, अमोल अभंग,बाळासाहेब शिरसागर,रावसाहेब जावळे,सुरेश थोरात, बाबासाहेब काळे, तांबे साहेब शिवाजी महाशिकारे, सतीश फुलारी, देवेंद्र काळे, भाऊसाहेब दरवडे, रामभाऊ पेहेरे, भागवत सर, जालिंदर विधाटे, बंडू पाटील, अरुण गोर्डे, भैरवनाथ भारस्कर,
मनोज हुलजुते, सुनील पंडित,शरद मिसाळ,परसराम औटी यांचेसह नेवासा तालुक्यातील सर्व गावांतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.सुखदेव फुलारी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.प्रा.संतोष तागड यांनी आभार मानले.