Tuesday, July 1, 2025

शिर्डी लोकसभेसाठी भाजपा कडून नितीन उदमलेंची तयारी ?

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : राहुल कोळसे:लोकसभा निवडणूक वारे महाराष्ट्रात व देशात जोरात वाहू लागले आहेत. सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. विविध पक्षांच्या नेत्यांच्या जागावाटप संदर्भात बैठक होत आहे.अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी

लोकसभा मतदारसंघासाठी अनेक नेते तयारी करत आहे. त्यामध्ये एक प्रामुख्याने व दिग्गज नाव समोर येत आहे ते म्हणजे भाजपाचे प्रदेश सह संयोजक भाजप किसान मोर्चाचे तसेच निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितिन उदमले यांच्या नावाची जोरदार चर्चा प्रदेश पातळीवर होत आहे.

नितीन उदमले यांच्या माध्यमातून पंतप्रधान विश्वकर्मा योजना , शेतकऱ्यांना विविध योजनावर मार्गदर्शन , महिलांसाठी महा उद्योगिनी प्रकल्प कार्यशाळा आयोजित करणे, युवक, तसेच विविध घटकांसाठी मोठे काम झाले आहे.या केलेल्या कामाच्या माध्यमातून

नितीन उदमले हे शिर्डी लोकसभेसाठी भाजपा कडून जोरदार तयारी करत आहे.त्यांनी सोशल मीडियावर एक पत्रक टाकून लोकसभा निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केली आहे.त्यातून रोजगाराचा मुद्याला महत्व दिले आहे.

सप्रेम नमस्कार : शिर्डी (पूर्वीचे कोपरगाव) लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अनेक विद्वान, महनीय व्यक्तींनी केलेले आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा संपूर्ण देशात दबदबा राहिलेला आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश सर्वच क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याकडे आपण वाटचाल करत आहोत .

सद्गुरू श्री साईबाबांची पुण्यभूमी म्हणुन शिर्डी चे मोठे महात्म्य व महत्व पूर्ण देशभर आणि जगभरात आहे. श्री बाबांवर श्रद्धा असणारी मंडळी शासन, प्रशासन, उद्योग व्यवसाय अश्या सर्वच क्षेत्रात विराजमान आहेत. त्यांच्या सहकार्याने व मोदीजींच्या व्हिजन मुळे शिर्डी लोकसभा मतदार संघात अनेक

मोठे प्रकल्प व विकास योजना आणल्या जाऊ शकतात. खाजगी उद्योगपतींच्या माध्यमातूनही रोजगार व व्यवसायाच्या नवनवीन संधी निर्माण केल्या जाऊ शकतात असा मला विश्वास वाटतो व यासाठी माझ्या प्रशासकीय ज्ञानाचा, अनुभवाचा, कौशल्याचा निश्चित मोठा उपयोग होईल.मागील दहा वर्ष्यात विशेष काम उभा राहू शकले नाही याची खंत वाटते.

सबब, आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी साठी मी माझ्या भारतीय जनता पार्टी कडे प्रयत्न करत आहे. सुदैवाने भारतीय जनता पार्टी उमेदवारी निश्चित करण्या पूर्वी देखील जनमताचा कौल घेते असते.

आपल्याला पुढील पाच वर्षात मोदीजींच्या नेतृत्वाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा मोठा विकास करण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी आपणाला निवडणुकी पूर्वीही भूमिका घेऊन शक्य त्या व्यासपीठावरून आणि समाज माध्यमातून माझ्या उमेदवारी साठी पाठिंबा व्यक्त करणे आवश्यक आहे.आपण त्यासाठी यथोचित पाठपुरावा करावा, ही नम्र विंनती.माझे फेसबुक, इंस्टाग्राम व ट्विटर id सोबत देत असून आपण माझ्या विषयीचे अधिक माहिती साठी मला follow करावे ही विंनती.

धन्यवाद.

[ आपला नम्र,नितीन नवनाथ उदमले.Ex Dy CEO (Z.P.),B. Sc. (Agri) ]

ही पोस्ट नितीन उदमले यांची नगर जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे. उदमले यांना चांगला पाठिंबा मिळत आहे.अशी माहिती सर्वे च्या माध्यमातून पुढे येत आहे. आता येणारा काळच सांगेल पुढे काय घडामोडी शिर्डी लोकसभा मतदारसंघात होतील.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!