भेंडा(वार्ताहर) राहुल कोळसे:– कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करता आहे त्या परिस्थितीत संकटाचा सामना करून परिस्थितीवर मात करायला शिका. स्वतःकडे कितीही ज्ञान असल तरी ते व्यक्त करता आलं पाहिजे.
गुरूविषयी निष्ठा ठेवा. आई वडीलांचा सांभाळ करा.वृध्दाश्रमाची संख्या कमी करा. व्यसनापासून दूर रहा. जिजामाता विद्यालयातील मातीचा गुण वेगळा आहे, या मातीमधून कलेक्टर, तहसिलदार, विक्रीकर निरिक्षक, पोलिस उपनिरिक्षक, डॉक्टर,
इंजिनियर, राजकिय नेते, समाजसेवक, कृषी आणि अध्यात्म अशा बहुविध क्षेत्रातील समाज व राष्ट्रबांधणी करणारे असंख्य व्यक्तिमत्व फूलले आहेत. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या तरूणांनी वाटचाल केली पाहिजे,असे प्रतिपादन देवगड संस्थानचे महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी यांनी केले.
भें डेडा येथील श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता १२वी च्या विद्यार्थ्याच्या सदिच्छा प्रदान कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
राष्टवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.शिक्षण संस्थेचे विश्वस्त माजी आ.पाडूरंग अभंग, अशोकराव मिसाळ, शिवाजी कोलते, शिक्षण संस्थेचे प्रशासकिय अधिकारी प्रा.भारत वाबळे, प्राचार्या डॉ. जयश्री सरवदे, प्रा.शशिकांत देशमुख,
प्रा. गोरक्षनाथ पाठक, प्रा. सुधाकर नवथर, प्रा. परमेश्वर उगले, डॉ. राजेंद्र गवळी, प्रा. दत्तात्रय तरटे, यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते.शिक्षण संस्थेचे विश्वस्त माजी आ.पाडूरंग अभंग म्हणाले की, आजच सर्वच क्षेत्रात मुली आघाडीवर आहेत.
मुलांनीही अभ्यास करून मुलींची बरोबरी करायला हवी. लोकनेते मारूतरावजी घुले पाटील यांनी ज्या दूरदृष्टीने या ज्ञानमंदिराची स्थापना केली ती गोरगरीब कष्टकरी शेतकरी, ऊसतोडणी कामगारांची मुले- मुली यशस्वी होतांना पाहून सार्थ होत आहे हे पाहून आनंद होतो आहे.
यावेळी वर्षभरातील विविध जिल्हा तालुका स्तरावरील गुणवंत विद्यार्थाचा पारितोषिके व प्रभाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. कु अनुष्का पगारे, कु वैष्णवी पटारे व अधिराज उगले या विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा भारत वाबळे यांनी केले. प्रा नानासाहेब खराडे व प्रा.सविता नवले यांनी सूत्रसंचालन केले.प्रा नंदकिशोर मते यांनी आभार मानले.