अहमदनगर दि.२६ जानेवारी
ध्वजदिन निधी संकलनाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा राज्याचे महसूल तथा नगर जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हस्ते सन्मान करण्यात आला.
अहमदनगर येथे पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ध्वजदिन निधी संकलनाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे तसेच मुंबई-पुणे मॅरॉथॉन स्पर्धेत यशस्वी कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचा पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शहीद जवानांच्या वीरपत्नी, कुटूंबियांना मदतीचा धनादेश, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा पारितोषिक वितरण,महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाच्या जिल्हास्तरीय विजेत्यांचा सन्मान, महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांचा सन्मानही पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.कार्यक्रमास पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांच्यासह शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.