Friday, May 17, 2024

वरखेड येथील गोदातीरी पोतराज बांधवांचे स्वच्छता अभियान

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील श्री महालक्ष्मी देवी वरखेड येथे नगर जिल्ह्यातील पोतराज बांधवांनी एकत्रित येऊन गोदावरीचा  किनार स्वच्छता अभियानाद्वारे परिसर स्वच्छ केला.या अभियानात पोतराजांनी चिखलात अडकलेल्या चिंध्याचे दहन केले.
     
श्री महालक्ष्मी देवी वरखेड येथे दर मंगळवारी व शुक्रवारी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.याच मंदिराच्या जवळ उत्तेरस गोदावरी नदी असून या परिसरात जुन्यात कुजलेले कपडे चिंध्या यामुळे पाणी दूषित होऊन मोठ्या प्रमाणात परीसरात दुर्गंधी सुटली होती.
     नगर जिल्ह्यातील पोतराज हे येथे सेवेसाठी आले असताना त्यांनी एकत्रित येऊन सर्व कुजलेले कपडे चिंध्या एकत्रीत करून त्याचे दहन केले.पवित्र गंगामाता आपली माता असून तिचे पावित्र्य भाविकांनी जपावे असे आवाहन यावेळी पोतराज संस्थेचे सेवक देविदास वैरागर यांनी यावेळी बोलताना केले.
    श्री महालक्ष्मीदेवी वरखेड येथे दर्शनासाठी येतांना गंगेचे पावित्र्य सर्व भाविकांनी जपावे गंगेकाठी कोणी घाण करू नये असलेल्या कुंड्यामध्येच टाकाऊ वस्तू टाकाव्यात असे आवाहन वरखेड देवस्थानचे सचिव कडूबाळ गोरे व उपाध्यक्ष लक्षाधीश दाणे यांनी यावेळी बोलताना केले.

यावेळी झालेल्या स्वच्छता अभियानात रामदास कणगरे,बबन वाघचौरे,देविदास वैरागर,नवनाथ भाग्यवंत,
ज्ञानेश्वर जगधने,राजू वैरागर,कचरू उबाळे,सुरेश जगधने,आनंद सकट, सौरभ टाके,ओंकार भारस्कर,आकाश भारस्कर,अभिजीत कणगरे, भानुदास ससाणे, साहिल वाल्हेकर,माऊली काते,सतीश माळी, पप्पू वैरागर,विकास साठे, सुभाष ठोकळ,माऊली सरोदे,निर्मला ससाणे, अलका वैरागर,अलका गिरे, राजेंद्र गिरे यांनी सहभाग नोंदवला.
या सर्व पोतराज बांधवांचे श्री महालक्ष्मी देवी देवस्थान स्ट्रस्टच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
यावेळी देवस्थानचे सचिव कडूबाळ गोरे,उपाध्यक्ष लक्षाधीश दाणे, विश्वस्त रंगनाथ पवार,नवनाथ वाघ,रामदास गोरे,भगवान जगधने,सुरेश शिरसाठ,रावसाहेब कुंढारे,रामचंद्र
कुंढारे,बाळू शिरसाठ,राजू शिरसाठ,रवी शिरसाठ उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!