माय महाराष्ट्र न्यूज:दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा बोर्डाने जाहीर केल्या आहेत. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २ ते २० फेब्रुवारीपर्यंत तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा १० ते २९ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.
बोर्ड परीक्षेसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षातील हजेरी ७५ टक्क्यांपेक्षा कमी असू नये, असा नियम आहे.पण, काही अडचणींमुळे हजेरी कमी लागली असल्यास त्या विद्यार्थ्यांस परीक्षेसाठी परवानगी मिळावी म्हणून संबंधित शाळांनी हजेरी क्षमापित करण्यासाठी
बोर्डाकडे प्रस्ताव पाठविणे जरुरी होते. मात्र आता बोर्डाने ७५ वरून ५० टक्के हजेरी मान्य केल्याने विद्यार्थ्यांसह शाळांना सोयीचे झाले आहे. प्रात्यक्षिक परीक्षांची तारीख जवळ आल्याने प्रात्यक्षिक परिक्षांचे साहित्य वाटप झाले आहे.
बोर्डाच्या परिक्षेला बसण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची वर्षभरातील किमान ७५ टक्के (प्रथम सत्रातील शाळा सुरू झाल्यापासून १५ ऑक्टोबरपर्यंत व द्वितीय सत्रात २६ ऑक्टोबर ते ३१ जानेवारीपर्यंत) असणे बंधनकारक आहे. ६५ ते ७५ टक्क्यांपर्यंत
हजेरी असलेल्यांना परिक्षेला बसू द्यावे किंवा नाही याबाबतचा प्रस्ताव संबंधित शाळेने बोर्डाच्या विभागीय मंडळाच्या अध्यक्षांना पाठवायचा आहे.त्यासोबत गैरहजेरीची कारणेही द्यावी लागतील. तर ६५ टक्क्यांपेक्षा कमी हजेरी असलेल्यांचे अर्ज राज्य मंडळाच्या अध्यक्षांना
पाठवावे लागतात. त्या विद्यार्थ्यांबाबत निर्णय तेच घेतात. बोर्डाच्या अध्यक्षांना संबंधित शाळांकडून पाठविलेली कारणे समाधानकारक वाटली तर ते संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास परवानगी देतात.
मात्र, आता बोर्डाने ५० टक्के हजेरी मान्य केली आहे. यामुळे वरील प्रकारचे पत्र देण्याची गरज राहणार नाही.