Wednesday, February 21, 2024

जिजामाता विद्यालयाला आयएसओ मानांकन

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तलुक्यातील भेंडा येथील श्री.मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला इंटरनॅशनल अँक्रिडेशन फोरम या आंतरराष्ट्रीय संस्थेचे आयएसओ ९००१-२०१५ चे प्रमाणपत्र प्राप्त झाले. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आ. नरेंद्र घुले पाटील यांनी हे नामांकन पत्र विद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जयश्री सरवदे यांचेकडे सुपुर्द केले.

यावेळी शिक्षण संस्थेचे प्रशासकिय अधिकारी प्रा.भारत वाबळे, पर्यवेक्षक प्रा. बाळासाहेब मोटे व प्रा.बाळासाहेब उगलमुगले, प्रा.सुधाकर नवथर, गोरक्षनाथ म्हस्के, आयएसओ समन्वयक डॉ.राजेंद्र गवळी आदी उपस्थित होते.

विद्यालयाचे दैनंदिन कामकाज, कार्यालयीन कामकाज, उपलब्ध साधन सामग्री, शैक्षणिक तसेच विविध क्रीडा प्रकारच्या सुविधा, ग्रंथालय, प्रयोगशाळा, वसतिगृह सर्व बाबींचे दिल्ली येथील इएमएस सर्टिफिकेशन व रॉयल असेसमेंट प्रा.लि. या नामांकित संस्थेमार्फत परीक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे मानांकन प्राप्त झाले आहे. नामांकनामुळे विद्यालयाच्या लौकिकात आणखी एक भर पडली.आयएसओ संदर्भात समन्वयक म्हणून डॉ.राजेंद्र गवळी यांनी काम पाहिले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!