Wednesday, May 13, 2026

शेवगाव येथे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन

IMG-20260511-WA0029
IMG-20260511-WA0029
previous arrow
next arrow
Shadow

शेवगाव/प्रतिनिधी

अनंत श्री विभूषित आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान दक्षिण पिठ यांचे वतीने जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज याचा पादुका दर्शन सोहळा खंडोबा मैदान, शेवगाव येथे सोमवार दि.५ फेब्रूवारी  २०२४ रोजी सकाळी ठीक ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात, जसे की ग्राम स्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमाची मोफत शाळा, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मरणोत्तर देहदान रक्तदान शिबिर, मोफत रुग्णवाहिका सेवा महाराष्ट्रातील विविध महामार्गावर ५२ रुग्णवाहिका २४ तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र वाटप, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिर
आयोजित केले जातात.
राज्यात विविध महामार्गावर
अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांना प्राण गमवावा लागतो म्हणून त्यांना तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते जेणेकरून त्यांना जीवनदान मिळेल नेमका हाच धागा पकडून जगद्गुरुश्रींनी या सेवेचा प्रारंभ केला आहे. या सेवेला १४ वर्षे पूर्ण होत आहेत. आज पर्यंत या सेवेच्या माध्यमातून वीस हजाराच्या वर रुग्णांचे प्राण वाचले आहे. या पादुका दर्शन सोहळा कार्यक्रमात सकाळी पादुका, गुरुपुजन सोहळा, श्रींच्या पादुकांचे आगमन,सामाजिक उपक्रम, गुरुपुजन, आरती सोहळा,प्रवचन, भक्त दिक्षा, दर्शन, पुष्पवृष्टी संपन्न होणार आहे.

तरी या पादुका दर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमास संपूर्ण जिल्हा सेवा समिती, पीठ समिती सदस्य, सर्व तालुकाध्यक्ष तालुका सेवा समिती सेवा केंद्र समिती, आरती केंद्र समिती युवा सेना, महिला सेना, हिंदू संग्राम सेना, गुरु सेवक, प्रोटोकॉल अधिकारी ,प्रवचनकार, जिल्ह्यातील सर्व आजी व माजी पदाधिकारी उपासक साधक शिष्य, भक्तगण, हितचिंतक जिल्ह्यातील सर्व गुरु बंधू व गुरु भगिनी यांनी कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सेवा समितीच्या वतीने श्री. सोमेश्वर घोगरे, निरीक्षक, सागर तिखे, जिल्हाध्यक्ष
जिल्हा सेवा समिती अहमदनगर दक्षिण यांनी केले आहे. पादुका दर्शन सोहळा कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातील शेवगाव, नगर, पाथर्डी, जामखेड, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यातील सेवा समीती सदस्य गावागावात जावून भेटी घेऊन प्रचार प्रसार करीत आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!