Wednesday, February 21, 2024

इन्स्टाग्रामच नाही, तर ‘या’ अ‍ॅप्समधूनही करु शकता जबरदस्त कमाई….

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्हाला व्हिडीओ बनवण्यात रस असेल आणि युजर्ससमोर काही खास कंटेंट सादर करू शकत असाल तर तुम्ही त्यातून पैसेही कमवू शकता. पण, इन्स्टाग्राम हे यासाठी एकमेव प्लॅटफॉर्म नाही.

आम्ही तुम्हाला सांगतो, या डिजिटल युगात आणखीही अनेक ॲप्स आहेत जे तुमची कमाई वाढवण्यात मदत करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया त्या ॲप्सबद्दल.हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

व्हिडिओ शेअरिंग ॲपच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मोठी रक्कम कमावण्याची संधी मिळू शकते. Likee ॲपमध्ये, तुम्हाला व्ह्यूजच्या आधारावर क्राउन दिला जातो, ज्याला तुम्ही रुपयात कन्व्हर्ट करून पैसे कमवू शकता.

व्हिडिओ बनवताना त्यातील कंटेंट नवीन आणि यूनीक ठेवणे खूप महत्वाचे आहे.Kwai ॲप हे ॲप तुम्हाला अँड्रॉइड मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअरवर मिळेल. इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवले जातात, त्याच पद्धतीने Kwai ॲपही काम करते.

या ॲपवर व्हिडिओ शेअर केल्यानंतर, जेवढे व्ह्यूज वाढतील त्यानुसार तुम्हाला कॉइन्स मिळतील. तुम्ही हे कॉइन्स डॉलर किंवा रुपयात बदलू शकता. मात्र यासाठी तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ बनवावे लागतील.

मोज ॲप YouTube-Instagram प्रमाणे या ॲपवरही तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. याशिवाय तुम्ही लाइव्ह येऊन लोकांशीही कनेक्ट होऊ शकता. युनिक कंटेंटसह चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ अपलोड करून तुम्ही त्यातून मासिक कमाई देखील करू शकता.

Moj ॲपची खास गोष्ट अशी आहे की ते तुम्हाला कोलॅबरेशनची सुविधा देते आणि तुम्ही त्यासोबत एफिलिएट मार्केटिंग देखील करू शकता.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!