Wednesday, February 21, 2024

मोठी बातमी: महाराष्ट्रात लोकसभेसोबत होणार विधानसभेच्या निवडणुका?

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर स्थापन केलेल्या कोविंद समितीला राजकीय पक्षांकडून आतापर्यंत ३५ निवेदने प्राप्त झाली आहेत.

विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र निवडणुका घेण्याचे समर्थन केले आहे. ‘एकत्र निवडणुका घेतल्या तर पैशाची बचत होईलच; पण कमी वेळेत निवडणूक प्रक्रिया

पार पडेल,’ असे शिंदे यांनी कोविंद समितीला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोरामच्या निवडणुका अलिकडेच झाल्या होत्या. पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत

महाराष्ट्र, हरियानासह अन्य राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. एकत्रित निवडणुका झाल्यास सर्वच बचत होते, असे शिंदे यांनी म्हटले आहे.एनडीए’ सरकारकडून ज्या महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून

आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यात एक देश-एक निवडणुकीचा समावेश आहे. वारंवार निवडणूक होणे अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

दरम्यान भाजपला लोकसभा जितकी महत्वाची आहे, तितकीच आम्हाला विधानसभा निवडणूक महत्वाची आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीवेळी विधानसभेची जागा निश्चिती झाली तरच, भाजपला मदत

करता येईल, असा सूचक इशारा प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी येथे दिला.भाजपने लोकसभेपूर्वी विधानसभेच्या जागा वाटपाचा प्रश्न सोडवायला हवा. आम्हाला दुसऱ्या कुणाच्या कोट्यात जाण्याची गरज नाही. प्रहार हाच आमचा कोटा आहे.

जागा वाटपाचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही जळगाव, अमरावती या ठिकाणी निवडणुका लढू, असे त्यांनी सूचित केले. राजकीय नेत्यांमुळे समाजात दुही निर्माण होत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी नागरिकांनी आपल्यासह कुठल्याही राजकीय

नेत्यांच्या विधानांना फारसे गांभिर्याने घेऊ नये, असा सल्ला दिला. प्रत्यक्षात काय घडते, आपण एकोप्याने किती चांगले राहू शकतो याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!