माय महाराष्ट्र न्यूज:जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात थंडीने मोसमातील नीचांक गाठल्यानंतर आता फेब्रुवारीमध्ये परत एकदा तापमानात वाढ होऊ लागली आहे.
सध्या शहरातील किमान तापमान १५, तर कमाल तापमान ३० अंशाच्या आसपास आहे. मात्र, दुसऱ्या आठवड्यात नागपुरात थंडीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यंदा विदर्भात थंडीची भट्टी फारसी जमलीच नाही. तरीसुद्धा जानेवारीअखेरीस थोडीफार थंडी जाणवू लागली होती. या काळात ८.७ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. हा या मोसमातील नीचांक होता.
मात्र, त्यानंतर परत एकदा तापमान सामान्य झाले व आता त्यात वाढही होऊ लागली आहे. रविवारी शहरात ३२.२ इतक्या कमाल आणि १५.३ इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली.
पुढील काही दिवस हे तापमान कायम राहणार आहे. त्यानंतर ८ ते १४ फेब्रुवारी या काळात विदर्भात सरासरी किंवा त्याहून अधिक पावसाची शक्यता आहे. तसेच या काळात किमान तापमानात १ ते ३ अंशांची
घसरण होण्याचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात थंडीने मोसमातील नीचांक गाठल्यानंतर आता फेब्रुवारीमध्ये परत एकदा तापमानात वाढ होऊ लागली आहे.