Wednesday, May 13, 2026

शेवगाव येथे जगद्गुरू नरेन्द्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळा उत्साहात संपन्न

IMG-20260511-WA0029
IMG-20260511-WA0029
previous arrow
next arrow
Shadow

शेवगाव/प्रतिनिधी

अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा पादुका दर्शन व प्रवचन सोहळा शेवगाव येथील खंडोबा मैदानावर सोमवार दि.५ फेब्रूवारी रोजी मोठ्या उत्साहात हजारो भक्तगणांचे उपस्थितीत संपन्न झाला अशी माहिती अहमदनगर दक्षिण जिल्हा संप्रयदायाचे जिल्हा निरीक्षक श्री. सोमेश्वर घोगरे यांनी दिली.

भव्य शोभायात्रेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली मध्ये प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्षमणजी तसेच शेगावीचे संत गजानन महाराज असे विविध प्रकारचे देखावे तयार करण्यात आले होते. या शोभायात्रेचे शुभागमन वाजत गाजत कार्यक्रमाच्या ठिकाणी झाले. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थितीत स्वच्छता अभियान अंतर्गत टॉयलेट व्हॅनची चावी संस्थान साठी कार्यक्रम प्रमुख यांचे कडे देण्यात आली.

कार्यक्रमात संस्थानच्या प्रवचनकार सौ. बाबरताई यांचे अतिशय सुंदर असे अमृततुल्य प्रवचन संपन्न झाले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित भक्तगणांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा अध्यक्ष सागर तिखे, महिला अध्यक्ष छायाताई ठाकरे, विभागीय निरीक्षक पांढरे ताई, सुरेश राऊत तालुकाध्यक्ष भिमराव साखरे कांताताई दळे शेवगाव तालुक्यातील भक्तगण यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील सर्व समितीच्या सर्व पदाधिकारी व भक्तगण यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!