Wednesday, February 21, 2024

नगर जिल्ह्यातील घटना:अल्पवयीन मुलीसोबतच्या तरुणाला हॉटेलमध्ये खोली भाड्याने दिली; पुढं घडलं नको तेच

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.अल्पवयीन मुलीच्या वयाची शहानिशा न करता तिच्याबरोबर आलेल्या तरुणाला हॉटेलची खोली

भाडोत्री उपलब्ध करून दिली. त्याच खोलीत मुलीवर लैंगिक अत्याचार झाला. याप्रकरणी अटक केलेल्या हॉटेल मालकाला रविवारी राहुरी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

गुहा येथील हॉटेल मैत्री पार्कचे मालक रवींद्र योसेफ जाधव (वय ३८, रा. मोरगे वस्ती, श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे. राहुरी पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये दाखल

झालेल्या एका गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपी तरुणाला हॉटेल मालकाने खोली उपलब्ध करून दिली. या प्रकरणी संबंधिताला अटक करण्यात आली आहे.ओळखपत्र, वय, मोबाईल नंबरची

खातरजमा न करता हॉटेलची खोली देऊन गुन्हेगाराला मदत केली. त्यामुळे राहुरी पोलिसांनी हॉटेल मालकाविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. अशाप्रकारे अल्पवयीन मुलींना हॉटेल लॉजेस उपलब्ध करून दिले

जात असल्यास, त्याची माहिती नागरिकांनी पोलिस ठाण्यात कळवावी. माहिती देणाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!