Sunday, May 5, 2024

सर्वात मोठी बातमी: शरद पवार गटाचं नाव आणि चिन्ह ठरले ?

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाला दिला आहे. त्यानंतर अजित पवार गटाकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आले

असून राज्यभरात जल्लोष केला जात आहे. दुसरीकडे शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली असून आज संध्याकाळपर्यंत पक्षासाठी नाव आणि चिन्ह सुचवण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार आज शरद पवार गटाकडून पक्षाचे नाव आणि चिन्ह सादर केले जाण्याची शक्यता आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार गटाने पक्षासाठी नाव आणि चिन्ह निवडले आहे. मीडिया रिपोर्टनुसार शरद पवार गटाने पक्षासाठी ‘मी राष्ट्रवादी पार्टी’ हे नाव आणि ‘उगवता सूर्य’ हे चिन्ह निवडले आहे. तसेच हे नाव आणि चन्ह

मिळावे यासाठी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे मागणी केली जाण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत शरद पवार गटाला चिन्ह आणि नाव दिले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष

जयंत पाटील यांनी आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवार असल्याचे ट्वीट केले आहे.राज्यसभेच्या निवडणुका तोंडावर असताना शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या निवडणुका होणार आहे.

त्यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला पक्षासाठी 3 नावे आणि 3 चिन्हे सादर करण्याच्या सूचना केली होती. त्यामुळे शरद पवार गटाला आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पक्षासाठी नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगासमोर सादर करावे लागेल.

त्यानंतर आजच शरद पवाग गटाचे पक्षाचे नाव आणि चिन्ह निश्चित होण्याची शक्यता आहे. परंतु शरद पवार गटाने निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळेत नाव आणि चिन्हांची यादी सादर केली नाही तर त्यांना अपक्ष म्हणून मान्यता दिली जाण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा निकाल धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हातातून

पक्ष हिसकावून घेतला जातोय. निकालाचा सविस्तर अभ्यास करुन आम्ही त्यावर भाष्य करू अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असून सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे असे म्हटले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!