Sunday, December 22, 2024

अत्यंत महत्त्वाची बातमी फास्टॅग’ची केवायसी फेब्रुवारीच्या या तारखेपर्यंत करा नाही तर…

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :‘फास्टॅग’ची केवायसी करण्याची अंतिम मुदत २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. आधी ही मुदत ३१ जानेवारी २०२४ पर्यंत होती.

केवायसी अद्ययावत करण्याची प्रक्रिया ऑनलाइनही पार पाडता येऊ शकते. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही घोषणा केली आहे. ‘फास्टॅग’द्वारे महामार्गावर सुलभतेने टोल भरणा केला जातो.

गाडीच्या विंडस्क्रीनवर लावलेल्या टॅगला स्कॅन करून टोल जमा करून घेतला जातो. नोंदणीकृत मोबाइलद्वारे ऑनलाइन फास्टॅग केवायसी पूर्ण केली जाते. मोबाइलद्वारे फास्टॅग वेबसाइटवर लॉगइन करून

ओटीपीच्या आधारे माय प्रोफाईल सेक्शनमध्ये जाऊन केवायसी अद्ययावत करता येते.गाडीची आरसी, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, छायाचित्र, ओळख व पत्त्याच्या पुरावा, वाहन चालविण्याचा परवाना.

fastag.ihmcl.com वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर ओटीपीद्वारे माय प्रोफाईलमध्ये जाता येते. केवायसी स्टेट्सवर क्लिक करताच फास्टॅगची स्थिती समजते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!