नेवासा/प्रतिनिधी
पैठण येथील जायकवाडी धरणात १५ हजार एकरातील प्रस्तावित तरंगता सौरऊर्जा प्रकल्प रद्द कारावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील हजारो मच्छीमार आक्रमक झाले आहेत. यासाठी मच्छीमारांनी बुधवार दि.७ फेब्रूवारी रोजी जायकवाडी धरणात जलसमाधी आंदोलन केले..छत्रपती संभाजी नगरचे प्रभारी जिल्हाधिकारी,गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व विभागीय वन अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याने सांयकाली ५ वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.
बुधवार दि.७ रोजी दुपारी १२ वाजता होणारे आंदोलन पोलिस दडपतील म्हणून मच्छीमारांनी गनिमीकावा करत पहाटेच धरणावर धाव घेतली. ज्यामुळे पोलिसांची तारांबळ उडालेली दिसून आली. तर जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही. तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा हजारो मच्छीमारांनी घेतला आहे.
पैठण येथील जायकवाडी धरणावर सौरऊर्जा प्रकल्प करण्यात येणार आहे. यासाठी धरणातील नाथसागर जलाशयावर १५ हजार एकरावर सर्वे केला जात असून तो नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या शासकीय संस्था करत आहे. तर त्यांनी हे काम जीओ सर्व्हिसेस मॅरीटाइम प्रा. लि. या एजन्सीला दिले आहे. हा सर्व्हे तात्काळ बंद करण्यात यावा हा मागणीसाठी हजारो मच्छीमारांनी नाथसागरात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे
*जिल्हाधिकारयांचे आश्वासन…
जायकवाडी पक्षी अभयअरण्या जलाशयावरील प्रस्तावित तरंगता सौरउर्जा प्रकल्प उभारण्याची प्रस्तावित जागा पर्यावरण प्रतिबंधीत क्षेत्र असून सदर क्षेत्रात असून आपल्या निवेदनामध्ये नमूद मागणी पुढील नियमोचित निर्णयासाठी जायकवाडी पक्षी अभयारण्यासाठी गठीत समितीपुढे विचारार्थ ठेवणे बाबत सदर समितीचे सदस्य सचिव तथा उपवनसंरक्षक यांना कळविण्यात आलेले आहे. सदर बाबतीत आपले निवेदनाची प्रत केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने दि.12.07.02017 रोजी जायकवाडी पक्षी अभयारण्याकरीता ‘इको सेन्सीटीव झोन’ वावत अंतिम अधिसूचना जारी केली आहे.
सदर अधिसूचनेची प्रत दि. 09.8.2017 चे पत्रान्वये शासनाने जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती गठीत केली आहे. सदर समितीचे सदस्य सचिव उपवन संरक्षक, छत्रपती संभाजीनगर यांचेकडे पाठविण्यात येत असून आपल्या निवेदनातील मागणीच्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्याबाबत बाबत त्यांना कळविण्यात आले आहे असे लेखी आश्वासन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी दिले आहे.
*गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून आश्वासन…
जायकवाडी प्रकल्पाचे बुडीत क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून घोषित असल्याने व Eco sensitive Zone अंतर्गत येत असल्याने जायकवाडी धरणाच्या जलाशयावरील प्रस्तावित सौर प्रकल्पासाठीच्या पुलीग स्टेशनसाठी भाडेतत्त्वावर 6 हेक्टर जागा उपलब्ध करून देणेबाबतचा नियामक मंडळाचा ठराव रह करणेबाबतचा ठराव, प्राधिकरण कार्यालयाच्या संदर्भ पत्र क्र. 3 च्या प्रस्तावानुसार नियामक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल असे लेखी आश्वासन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता स.कॉ. सब्बीनवार यांनी दिले.
*विभागीय वन अधिकारी यांचे आश्वासन….
जायकवाडी मच्छिमार बचाव संघर्ष समिती छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर जिल्हा यांनी जायकवाडी जलाशयावरील प्रस्तावित तरंगता सौरऊर्जा प्रकल्प रद्द करावा, यासाठी दिनांक 07 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 12:00 वा जायकवाडी मच्छिमार बचाव संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचेसह हजारोंच्या संख्येने पुरुष व महिलांचे वतीने जलसमाधी आंदोलन जायकवाडी (उत्तर) ता. पैठण येथील आय.वी. विश्रामगृहाच्या मागील पंप हाऊस परिसरातील जायकवाडी धरणाचे पाण्यात करणे बावत या कार्यालयास कळविले होते.
त्यानुसार तरंगता सौरउर्जा प्रकल्पाविषयी सद्यास्थितीविषयी संघर्ष समितीच्या अध्यक्षांना लेखी कळवुन समिती मार्फत आयोजित आंदोलन मागे घेण्याबाबत त्यांना विनंती करण्यात आली होती. मात्र जायकवाडी येथे आंदोलन छेडण्यात आले असुन सदरचा प्रस्तावित तरंगता सौJरउर्जा प्रकल्पावावत वन विभागाचे भुमिका तात्काळ शासन कळविल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नराल्याची ठाम भुमिका आंदोलनाकर्ते यांनी घेतलेली असल्याने कुठलीही कायदा- सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये याठी प्रस्तावित तरंगत्या सौरउर्जा प्रकल्पाविषयी सद्यास्थिती पुढील प्रमाणे आपणांस सविनय सादर करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग क्रमांक 869 (i) फ-5, दिनांक 10 ऑक्टोंबर 1906 अन्वये जायकवाडी पक्षी अभयारण्य घोषित करण्यात आलेले असून, सदर अभयारण्याचे ३ अन्वये जा संभाजीनगर व अहमदनगर जिल्हयात विस्तारलेले आहे. डब्ल्यू.एल.पी.1086/27206/प्र.क्र.39/
तसेच केंद्र शासन अधिसुचना क्रमांक तसेच केंद्र शासन अधिसुचना क्रमांक एस.ओ. 2202 • (ई) दिनांक 12 जुलै 2017 अन्वये जायकवाडी पक्षी अभयारण्य सभोवती पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित झालेले असून, ० ते 500 मी. लांबी पर्यंत विस्तारलेले आहे.वरील प्रमाणे क्षेत्रास वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 च्या तरतुदी लागू होत असून, सदर क्षेत्रात कोणतेही वनेत्तर कामे करावयाची असल्यास वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 च्या तरतुदी नुसार राज्य/राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची पुर्व परवानगी घेणे अनिवार्य असून, त्याकरीता सबब प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयास सादर होणे आवश्यक आहे. असे न झाल्यास वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 च्या तरतुदी चे उल्लंघन ठरते.
या कार्यालयाकडून जायकवाडी पक्षी अभयारण्याचे संरक्षित क्षेत्रात कोणत्याही प्रकराचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प प्रस्तावित नसून, त्याबाबचे कामे देखील या कार्यालयामार्फत प्रस्तावित अथवा सुरु नाहीत. जायकवाडी पक्षी अभयारण्याचे संरक्षित क्षेत्राची संरक्षण व संवर्धन बाबतची “जबाबदारी विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) छत्रपती संभाजीनगर कार्यालयाकडे असून, त्याअनुषंगाने या कार्यालयाचे अधिनस्त अधिकारी/कर्मचारी यांचे मार्फत वारंवार वेळोवेळी संरक्षण व संवर्धन करण्यात येत आहे.
तसेच जायकवाडी पक्षी अभयारण्याचे संरक्षित क्षेत्रात अद्यापपर्यंत इतर शासकीय यंत्रणा यांचेकडून देखील तरंगता सौरऊर्जा प्रकल्प करीता राज्य/राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे पूर्व परवानगी बाबतचा प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झालेला दिसून येत नाही. तसेच जायकवाडी पक्षी अभयारण्याचे संरक्षित क्षेत्रात तरंगता सौरऊर्जा प्रकल्पाचे अनुषंगाने कामे सुरू असल्याचे आढळून येत नाही. केवळ NTPC, Renewable Energy Limited, NTPC Bhawan, New Delhi या यंत्रणेमार्फत Commencement of Bathymetry Studies In Jaikwadi Reservoir करीता सर्व्हेक्षणाची परवानगी मागण्यात आली होती. सदर सर्व्हेक्षणास परवानगी प्राप्त होवून, Bathymetry Studies चे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. मात्र या प्रकल्पाबाबत प्रकल्प यंत्रणेकडुन पुढे काय कार्यवाही सुरु आहे याबाबत हे कार्यालय अनभिज्ञ आहे.
उपरोक्त परिस्थितीबाबत जायकवाडी मच्छिमगार यचाव संघर्ष समितीचे आंदोलनकर्ते यांना अवगत करण्यात आले असुन तरंगत्या सौरउर्जा प्रकल्पाची उभारणी करण्याबाबत प्रकल्प
यंत्रणेकडुन प्रस्ताव प्राप्त झाल्यास जायकवाडी जलाशय परिसरातील जैवविविधता जोपासनेच्या दृष्टीने प्रकल्पाबाबत यथायोग्य शिफारस शासनाकडे करण्यात येईल असे लेखी आश्वासन छत्रपती संभाजीनगरेचे विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एम. बी. नाईकवाडी यांनी दिले आहे.
*हजारो मच्छीमारांचा व्यवसाय संपुष्टात….
जायकवाडी धरणाच्या जलाशयात हा प्रकल्प करण्यात येणार आहे. यामुळे येथील छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील २२ हजार कुटुंबांच्या व्यवसायावर कुऱ्हाड येणार पडणार आहे. तर २ लाख मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. सध्या येथील मच्छीमार हा दिवसा तीनशे ते चारशे येथून मच्छीमारीकरून कमावतो. पण जर हा सौरऊर्जा प्रकल्प झाला तर हजारो मच्छीमारांचा व्यवसाय संपुष्टात येईल.
*कहार समाज आंदोलनात सहभागी…*
दरम्यान हे जलसमाधी आंदोलन करण्यासाठी दोन दिवसांपासून कहार समाजातील मच्छीमारांचे कुटुंबांनी तयारी केली होती. तर बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास होणाऱ्या जलसमाधी आंदोलनासाठी काही लोक आधीच जायकवाडी धरणाच्या नाथसागराच्या परिसरात दाखल झाले होते. मात्र जलसमाधी आंदोलन रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी विशेष प्रयत्न करत मोठा फौजफाटा तैनात केला होता. यावरून गनिमिकाव्याचा वापर करून मच्छीमारांनी पहाटेच हे आंदोलन सुरू केले.दरम्यान नाथसागरातील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करणारा आदेश शासन जोपर्यंत काढत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असा इशारा मच्छीमार संघटनेने दिला आहे.