माय महाराष्ट्र न्यूज:उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. दिल्लीत थंड वाऱ्यांमुळे थंडी कायम आहे. मात्र राज्यात थंडीचा प्रभाव हा हळूहळू कमी होताना दिसत आहे.
मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होताना दिसत आहे. मुंबईकरांना आता उन्हाचे चटके बसू लागले आहेत. तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी
अवकाळी पावसाचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.विदर्भ आणि मराठवाड्यात आजपासून ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज
हवामान विभागाने वर्तवला आहे. तर 9 फेब्रुवारीला हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पूर्व विदर्भापासून तेलंगण, कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडू शकतो.
यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे सरक्षण करावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत.दरम्यान राज्यात उन्हाचे चटके आता जाणवू लागले आहेत. पुणे, कोल्हापूर, सांगली, अकोला, वाशीम, यवतमाळ यथे
तापमानाचा पारा 35 अंशांच्या वर आला आहे. किमान तापमानाचा पारा 11 ते 22 अंशांच्या दरम्यान असून, थंडी कमी झाली आहे. आज देखील तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.