Tuesday, February 11, 2025

आनंदाची बातमी:सोन्या चांदीचे भाव घसरले, जाणून घ्या आजचे दर….

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही जर सोनं-चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सोन्या चांदीच्या दराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

गुरुवार, ५ एप्रिल, २०२४ रोजी, MCX एक्सचेंजवर डिलिव्हरीसाठी सोने ०.१८ टक्क्यांनी कमी होऊन ६२,४१२ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे.

सध्या, ५ जून २०२४ रोजी वितरणासाठीचे सोने १४० अंकांनी घसरून ६२,७४८ रुपयांवर व्यवहार करत आहे.सोन्याबरोबरच चांदीच्या देशांतर्गत वायदा किमतीतही घसरण पाहायला मिळत आहे.

गुरुवारी, MCX एक्सचेंजवर, ५ मार्च २०२४ रोजी डिलिव्हरीसाठी चांदी ०.१७ टक्क्यांनी किंवा १२२ रुपयांनी कमी होऊन ७०,१८९ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

३ मे २०२४ रोजी डिलिव्हरीसाठी असलेली चांदी  ७१,४८४ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.गुरुवारी जागतिक सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. कॉमेक्सवर सोन्याच

जागतिक फ्युचर्स किंमत ०.२८ टक्क्यांनी कमी होऊन २०४५.९० प्रति औंस डॉलरवर व्यवहार होताना दिसली. सोन्याची जागतिक स्पॉट किंमत सध्या प्रति औंस २०३१.३४ डॉलरवर व्यवहार करताना दिसत आहे.

जागतिक पातळीवर आज चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. कॉमेक्सवर, चांदीचे फ्युचर्स ०.०४ टक्केच्या वाढीसह २२.३७ प्रति औंसवर व्यवहार करताना दिसून आले.चांदीची जागतिक

स्पॉट किंमत २२.३० डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसून आली.सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. आजही सोन्या-चांदीचे भाव घसरत आहेत. सोन्याच्या जागतिक किमतीतही

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!