Wednesday, February 21, 2024

मोठी बातमी : शिर्डी लोकसभेसाठी ठाकरे गटाचा उमेदवार ठरला ?

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसंबंधी जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकरे शिवसेना ठाकरे गटाने आपले 11 उमेदवार

निश्चित केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये वायव्य मुंबईतून अमोल कीर्तीकर , तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांचं नाव अंतिम करण्यात आलं असून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून विनायक राऊत

तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाने आतापर्यंत शिक्कामोर्तब केलेले लोकसभा उमदेवार

– बुलढाणा – नरेंद्र खेडेकर

– ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील

– रायगड – अनंत गीते

– रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत

– दक्षिण मुंबई – अरविंद सावंत

– वायव्य मुंबई – अमोल कीर्तीकर

– संभाजीनगर -चंद्रकांत खैरे

– धाराशिव – ओमराजे निंबाळकर

– परभणी – संजय जाधव

– ठाणे – राजन विचारे

– शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे

आगामी लोकसभा निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचं शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने ठरवलं आहे. त्यासाठी जागावाटपाचीही चर्चा सुरू आहे.

यामध्ये शिवसेना ठाकरे गटाने 48 पैकी 23 जागांची मागणी केली आहे. या जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याआधीच शिवसेना ठाकरे गटाकडून 11 जागांवर नावं फायनल करण्यात आल्याची माहिती आहे.

त्यामुळे लोकसभेसाठी ठाकरे गटाने आघाडी घेतल्याचं दिसून येतंय.शिवसेनेत झालेल्या बंडाचं मूळ ठाण्यात असून ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याचं मानलं जातंय. त्या ठिकाणाहून

खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात येणार असून त्यांनी तयारीही सुरू केली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!