भेंडा/नेवासा
नेवासा तालुक्यातील निर्मलग्राम भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी पंढरीनाथ रामराव फुलारी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद हे रोटेशन पद्धती नुसार एक -एक वर्षासाठी ठरविल्यामुळे सौ.मंगल अरुण गोर्ड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झाले होते.सरपंच सौ.रोहिणी निकम यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.९ फेब्रूवारी रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या सभेत उपसरपंच पदी पंढरीनाथ फुलारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ.वैशाली शिंदे,सौ.संगीता गव्हाणे, सौ.संगिता शिंदे,सौ.स्मिता काळे,सौ.मंगल गोर्डे,सौ.लताबाई सोनवणे,अण्णासाहेब गव्हाणे,सौ.उषा मिसाळ, सौ.सुहासिनी मिसाळ,सौ.स्वाती वायकर,सौ.माया गंगावणे, दिलीप गोर्डे,दादासाहेब गजरे,कादर सय्यद,ग्रामविकास अधिकारी रेवन्नाथ भिसे उपस्थित होते.