शेवगाव दि.१० फेब्रूवारी २०२४
शेवगाव तालुक्यातील ताजनापुर येथे आयोजित भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे स्पर्धेचे उद्घाटन समारंभ माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हस्ते झाले.
नगर जिल्ह्याने अनेक नामवंत खेळाडू घडविले असे प्रतिपादन मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील यांनी यावेळी केले.
श्री.घुले पुढे म्हणाले की,
नगर जिल्ह्याने अनेक नामवंत खेळाडू घडविलेले आहे. क्रिडा क्षेत्रात सातत्य, जिद्द व मेहनत या त्री सुत्राचा अवलंब केला तर निश्चितच यश मिळते. क्रिडा क्षेत्राची आवड असणाऱ्यांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे जेणे करून आपले खेळात सातत्य राहण्यास मदत मिळते व सकारात्मकता वाढते. तरुणांनी खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे. आपण आपल्या ध्येयाच्या जवळ क्रिडा क्षेत्र हे मन, मेंदू आणि मनगट सदृढ ठेवण्यास मदत करते. स्पर्धांच्या माध्यमातून जिज्ञासू वृत्ती वाढीस लागते. आपल्या आवडत्या खेळाविषयी लहानपणापासूनच आवड व अंगी जिज्ञासा असली पाहिजे. पालकांनी सुद्धा पाल्याच्या आवडत्या क्षेत्रात करियर करून दिले पाहिजे. त्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. इंटरनेटच्या मायाजालात न अडकता मैदानावर या तरच शरीर चांगले ठेऊ शकू असेही मत श्री.घुले यांनी व्यक्त केले.
यावेळी संजय कोळगे, संजय फडके, बंडुशेठ रासने, लक्ष्मणराव वीर,कारभारी वीर,अशोकराव गायकवाड,कारभारी नजन, आप्पासाहेब वीर,कैलास नजन, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, सरपंच अशोक गायकवाड, विष्णू आर्ले, बंडू बर्डे, एकनाथ मोरे, मनोज मोरे, बापूसाहेब सुपारे, बाबासाहेब चव्हाण,उत्तमराव नाबदे,नारायण बालिया,सुदर खडागळे,दादु गायकवाड,बबनराव गायकवाड,पाडुरग वीर,यासह खेळाडु आणि ग्रामस्थ आदी उपस्थीत होते.