Monday, May 20, 2024

संतापजनक:नगरच्या प्राध्यापकांकडून विद्यार्थिनीकडे भलतीच मागणी;पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत तर मला…

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: बारावीच्या भूगोल विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत २० पैकी २० गुण देण्यासाठी प्राध्यापकाने विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याच्या आरोपावरून रयत शिक्षण

संस्थेच्या नगरमधील राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील प्राध्यापकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश शिर्के असे त्या प्राध्यापकाचे नाव आहे. सध्या बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. त्या दरम्यान हा प्रकार झाला.

त्या विद्यार्थिनीने मागणीकडे दुर्लक्ष केल्याने प्राध्यापकाने तिला प्रात्यक्षिक परीक्षेत शून्य गुण दिल्याचे आणि त्यासंबंधी विचारणा करण्यासाठी गेल्यावर पुन्हा तशीच मागणी करीत अश्लील हावभाव केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शहरात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात ही फिर्याद दिली आहे. ती तारकपूर भागातील राधाबाई काळे महिला महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकत आहे. सध्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहे.

प्रा. शिर्के भूगोलाचे शिक्षक आहेत. तिने फिर्यादित म्हटले आहे की ५ फेब्रुवारीला प्रा. शिर्के यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावून घेतले. तुला भूगोलाच्या प्रात्यक्षिक परिक्षेत २० पैकी २० गुण हवे असतील तर मला काय देशील? अशी विचारणा केली.

तेव्हा मी विषय टाळून तेथून निघून गेले. त्यानंतर महाविद्यालयाच्या आवारात भेटल्यानंतरही प्रा. शिर्के तशीच मागणी करीत राहिले. मात्र, मी त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी मला प्रात्यक्षिक परीक्षेत त्यांनी शून्य गुण दिले.

त्यामुळे ८ फेब्रुवारीला मी त्यांना त्यासंबंधी विचारण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी अश्लील हावभाव करीत पुन्हा तशीच मागणी केली. माझे लैंगिक शोषण करण्याचा त्यांचा हेतून ओळखून मी तेथून निघून गेले. मी घाबरलेले

असल्याने व बदनामी होईल म्हणून त्या दिवशी घरी कोणालाच काही सांगितले नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यांनी धीर दिला आणि आम्ही पोलिस ठाण्यात येऊन

फिर्याद दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात सतीश शिर्के यांच्याविरूद्ध विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार

गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!