Sunday, May 19, 2024

उद्या भारत व ऑस्ट्रेलिया क्रिकेटचा वर्ल्डकप फायनल सामना

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :भारत आणि ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्या वर्षी वर्ल्डकपची फायनल खेळणार आहे. 2023 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत रोहित सेनेच्या स्वप्नांचा चुराडा केला होता.

आता 19 वर्षाखालील भारतीय संघ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला भिडणार आहे.भारताने यापूर्वी U19 चा वर्ल्डकप हा पाचवेळा जिंकला आहे. 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये भारताने विजतेपद पटकावले होते.

आता रेकॉर्ड ब्रेक सहाव्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरण्याची संधी उदय सहारणच्या नेतृत्वाखालील संघाला असणार आहे.याचबरोबर अहमदाबादमधील भारताच्या पराभवाची परतफेड करण्याचीही संधी आहे.

हा असा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हाय व्होल्टेज वर्ल्डकप फायनल सामना कधी अन् कुठं होणार आहे. तो लाईव्ह कुठं पाहायचा हे जाणून घेऊयात.

भारत – ऑस्ट्रेलिया सामना कधी होणार आहे?

19 वर्षाखालील वर्ल्डकप 2024 चा अंतिम सामना हा रविवारी 11 फेब्रवारीला होणार आहे.

भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना कधी सुरू होईल?

हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 ला सुरू होणार आहे. नाणेफेक 1.00 वाजता होईल.

19 वर्षाखालील वर्ल्डकप 2024 अंतिम सामना कोठे होणार आहे.

भारत – ऑस्ट्रेलिया हा हाय व्होल्टेज फायनल सामना दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

फायनल कोणत्या टीव्ही चॅनलवरून थेट प्रसारित होणार आहे?

19 वर्षाखालील वर्ल्डकप 2024 ची फायनल ही स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रसारित होईल.

सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहावयास मिळेल?

भारत – ऑस्ट्रेलियाचा सामना हा हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीम होणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!